अकोला : नोकरीच्या नावाखाली २७ लाखांनी फसवणूक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Fraud

अकोला : नोकरीच्या नावाखाली २७ लाखांनी फसवणूक!

अकोला : खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खडकी परिसरातील एका ४९ वर्षीय महिलेच्या मुलाला नोकरी लावून देण्याच्या नावाखाली भाडेकरू महिलेने २७ लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी खदान पोलिसांनी ता. १ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. खदान पोलिस स्टेशनमध्ये खडकी येथील मंगरुळपीर रोडवर श्रद्धा रेसीडेन्सी येथे राहणाऱ्या मिरा काशीराम खरात (४९) यांनी खदान पोलिस स्टेशनला अमरावती येथील चंद्रकला कैलास गिरी (५६) या महिलेविरुद्ध फिर्याद दिली. या तक्रारीनुसार फिर्यादी ही तिच्या परीवारासह वरील पत्त्यावर राहते. त्या महसुल विभागातून वरीष्ठ लिपीक या पदावरून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या आहेत.

गेल्या आठ-नऊ महिन्‍यापूर्वी एक महिला त्यांच्याकडे खोली भाड्याने घेणेकरिता आली. तिने स्नेहा जुमळे असे नाव सांगून, ती बीईओ (गटशिक्षणाधिकारी) असल्याचे सागितले. ओळखपत्रसुद्धा दाखविले. त्यामुळे फिर्यादीने जवाई महेश पाटकर यांचे घर सात हजार रुपये प्रमाणे भाड्याने दिले. दरम्यान, तिने फिर्यादीला सांगितले की, तिची मुंबई व इतर ठिकाणी चांगली ओळख आहे. ती तरुणांना नोकरीवर लावून देते.

फिर्यादीचा मुलगा राहुल खरात हा बेरोजगार आहे. त्याला नोकरीवर लावण्यासाठी फिर्यादीला ३० लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे टप्या-टप्याने देण्याचे ठरविले. त्यानुसार ता. ११ फेब्रुवारी, २२, २३ मार्च २०२२ पर्यंत फिर्यादीने त्या महिलेला २७ लाख रुपये रोख दिले. पैसे घेतल्यानंतरही आजपर्यंत मुलाला नोकरीवर लावले नाही व घेतलेले पैसे परत केले नाही. वारंवार पैशाची मागणी केली. मुलाला नोकरीवर लावण्यास सांगितले; परंतु ती नेहमी काहीतरी कारण सांगून उडवाउडवीचे उतर देत होती. ता. २१ एप्रिल २०२२ रोजी आरोपी महिला फिर्यादीच्या घरी आली. तुमच्या मुलाला नोकरी लागते असे सांगून देव दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला. स्नेहा जुमळे तिचा मुलसह कौस्तुभ व सून जान्हवी असे तुळजापूर, नांदेड, अंबाजोगाई आदी ठिकाणी फिरून आले.

अकोला येथे परत आल्यानंतर आरोपी महिलेने केलेल्या मागणीनुसार फिर्यादीने परत ५० हजार रुपये दिले. सर्व रक्कम रोख दिली. ता. ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान फिर्यादी आरोपी महिलेच्या घरात गेली व मुलाची ऑर्डर कुठे आहे म्हणून विचारणा केली. त्यावेळी आरोपी महिलेने त्यांच्याशी वाद घातला व पैसेही परत देणार नाही, असे बजाविले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावरून मिरा खरात यांनी आरोपी महिलेविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.

ओळखपत्र, नाव खोटे

खदान पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांनी खराद यांच्या तक्रारीचा तपास केला असता स्नेहा जुमळे नावाने वावरणारी महिला ही अमरावती येथील शेगाव नाका परिसरात एशियाड कॉलनीमध्ये राहणारीचंद्रकला कैलास गिरी (५६) असे असल्याचे आढळून आले. तिने दाखविलेले ओळखपत्रही खोटे असल्याचे आढलून आले. तपासानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेला पोलिसांनी गुरुवारीच अटक केली असून,शुक्रवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Akola Unemployment Job Fraud 27 Lakh Khadan Police Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..