Akola Unseasonal Rain : अवकाळी पावसाने चार हजार हेक्टरवर नुकसान; ७४ गावांना फटका, ५५ घरांची पडझड

Akola News : ४८ तासांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अकोट, तेल्हारा, बाळापूर व मुर्तीजापूर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. ७४ गावे प्रभावित तर ५५ घरांची पडझड झाली आहे.
Akola Unseasonal Rain
Akola Unseasonal RainSakal

अकोला : जिल्हयात मागील ४८ तासांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने अकोट, तेल्हारा, बाळापूर व मुर्तीजापूर तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. ७४ गावे प्रभावित तर ५५ घरांची पडझड झाली आहे.

गुढीपाडव्याच्या संध्याकाळी जिल्हयात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरण प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर वीज पुरवठा सुरु झाला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कांदा, भुईमूग, भाजीपाल्यासह लिंबू व फळबागा उद्ध्वस्त झाला. काही ठिकाणी गहू, ज्वारी, कांदा, तिळ ही पिके पुर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत.

रब्बी व उन्हाळी कांदा, गहू, ज्वारी, भुईमूग, तीळ, भुईमूग, मूग व भाजीवर्गीय पिके तसेच लिंबू, आंबा या पिकांचे अवकाळी वादळासह पाऊस व गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहे.

त्यामुळे उत्पादनात घट होणार आहे. प्रामुख्याने बार्शीटाकळी तालुक्यात ५ हेक्टररवरील कांदा, तेल्हारा तालुक्यात ९२९ हेक्टरवर कांदा, गहू, मका, ज्वारी, भाजीपाला व केळी तर बाळापूर तालुक्यात २५० हेक्टरवर कांदा, ज्वारी, भाजापील्याचे नुकसान झाले.

पातूर तालुक्यात सर्वाधीक २८६६ हेक्टरवर कांदा, गहू, मका, ज्वारी, फळपीकांचे नुकसान झाले. मूर्तीजापूर तालुक्यातही १० हेक्टरवर ज्वारी, आंब्याचे नुकसान झाले. अशाप्रकारे जिल्हयात ४ हजार ०६० हेक्टरवर तसेच ७४ गावांमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

महावितरणचे प्रयत्न

अतीरिक्त कार्यकारी अभियंता सुशिल जैस्वाल यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपविभाग १ च्या संपूर्ण टिमणे वादळ थांबताच कामाला गती दिल्याने ३३ केव्ही डाबकी उपकेंद्राला काही तासातच पर्यायी व्यवस्थेतून ३३ केव्ही खडकी उपकेंद्राव्दारे वीज पुरवठा करून परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला.

त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ३३ केव्ही शिवाजीनगर उपकेंद्र आणि तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्यात रात्री एक वाजेपर्यंत महावितरणला यश आले. यासोबतच अतीरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल खंडारे यांची संपूर्ण टिमला खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

वादळवाऱ्याच्या संपूर्ण परिस्थितीवर अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट लक्ष ठेऊन होत. कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांच्या मार्गदर्शनात वादळामुळे विस्कळीत झालेली वीज यंत्रणा काही तासातच पुर्ववत करण्यात आली.

वीज वाहिन्यांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडीत

अकोला उपविभाग १ अंतर्गत येत असलेेले अकोला जुने शहर व परिसरातील भागाला ३३ केव्ही शिवाजीनगर व ३३ केव्ही डाबकी या दोन उपकेंद्राव्दारे वीज पुरवठा करण्यात येतो.तसेच या दोन्ही उपकेंद्राला अतीउच्चदाब उपकेंद्र २२० केव्ही आपातापा येथून ३३ केव्ही वीज वाहिनीव्दारे वीजपुरवठा करण्यात येतो.

परंतू काल वादळाचा प्रचंड वेग आणि कडाडणाऱ्या आकाशातील वीजांमुळे चुंबकीय दबाव निर्माण होऊन वीज यंत्रणेत अनेक ठिाणी दोष निर्माण झाले होते.तसेच अनेक ठिकाणी हवेच्या दबावामुळे वीज वाहिन्या तुटल्या होत्या.

विशेषता ३३ केव्ही आपातापा वीज वाहिनीच बंद पडल्याने ३३ केव्ही शिवाजीनगर आणि ३३ केव्ही डाबकी ही दोन्ही उपकेंद्रे प्रभावीत झाली होती.परिणामी लकडगंज,संतोषीमाता मंदिर परिसर,मटका बाजार,जुना लोहा बाजार,जुने शहर परिसर आणि वाशिम नाका परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com