Akola use water carefully 35% water storage in Katepurna
Akola use water carefully 35% water storage in Katepurnasakal

अकोला : पाणीसाठा पुरेसा; पण वापरा जपून!

काटेपूर्णात ३५ टक्के पाणीसाठा; पाऊस लवकर सुरू होण्याचे संकेत

बार्शीटाकळी : अकोला शहराला व लगतच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरविणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात सध्या ३५ टक्के जलसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील पावसाला १५ जूननंतर सुरुवात होते. ते बघता पुढील एक महिना पुरेल एवढा जलसाठा असला तरी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. मॉन्सूनच्या पावसाला लवकरच सुरुवात होण्याचे संकेत असल्याने चिंता करण्याचे कारण नाही.

अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान या दोन प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. त्यापैकी वान प्रकल्पावर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण नाही. मात्र, काटेपूर्णा प्रकल्पातून संपूर्ण अकोला शहर व मूर्तिजापूर तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो.

त्यासाठी राखीव पाणी व सिंचनासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागातर्फे केले जाते. गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे काटेपूर्ण प्रकल्प तुडुंब भरला होता. परिणामी उन्हाळ्यातही प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला. याशिवाय सिंचनासाठीही पाणी देण्यात आले. त्यानंतरही या प्रकल्पात ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यातून पुढील दोन महिने पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरविणे शक्य होणार आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाची स्थिती

कटेपूर्णा प्रकल्पात बुधवार, ता. १९ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ३५.७२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती प्रकल्पाच्या अभियंत्यांनी दिली.

महान येथील काटेपूर्णा जल प्रकल्पातून अकोला महानगरपालिकेच्या सोयी नुसार नियमीत पाणीपुरवठा करण्यात येतो. खांबोरा बंधाऱ्यातून ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून, ६४ खेड्यासह, अकोला एमआयडीसी, व मूर्तिजापूर शहरास पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या करीता खांबोरा बंधाऱ्यात महान धरणातून वांरवार पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा सर्वांनीच काटकसरीने वापर केल्यास आणखी दोन ते तीन महिनेपर्यंत पाणी पुरेल.

- प्रिया आगरकर, अभियंता, काटेपूर्णा जल प्रकल्प महान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com