Video: वान धरण रिकामेच, काटेपूर्णात 85 टक्के जलसाठा मध्यम प्रकल्पही 50 टक्क्यांच्यावर, लघु प्रकल्पही तुडुंब

मनोज भिवगडे
Tuesday, 11 August 2020

सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा करीत सातपुड्यातून वाहत येणाऱ्या पाण्यावर भिस्त असलेला वाण प्रकल्प अद्यापही रिकामेच असून, काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचल्याने पुन्हा दरवाजे उघड्याची वेळ येणार आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पातही जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला ः सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा करीत सातपुड्यातून वाहत येणाऱ्या पाण्यावर भिस्त असलेला वाण प्रकल्प अद्यापही रिकामेच असून, काटेपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचल्याने पुन्हा दरवाजे उघड्याची वेळ येणार आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पातही जलसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तुडुंब भरल्यास रबी तसेच उन्हाळी पीक शेतकऱ्यांना घेता येते. त्यामुळे पावसाळ्यात केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे तर व्यापारी, सर्व सामान्य नागरिकांचे प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे लक्ष लागलेले असते. जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान हे दोन मोठे प्रकल्प आहेत. वान प्रकल्पाची साठवण क्षमता ८१.९५ दशलक्षघनमीटर आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ऑगस्टमधील दहा दिवस लोटूनही प्रकल्पात ३४.४९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. वान प्रकल्पातून अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा केला जातो.

त्याच बरोबर हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणल्या जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 
तर काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर असून, प्रकल्पात ७२.९१ दलघमी (८४.४४ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. वाशीम, मेडशी, मालेगाव भागात जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.
नवविवाहितेला आधी मारले आणि नंतर लटकविले फासावर, पतीसह सासू-सासऱ्यांनी केला विवाहितेचा खून,
आत्महत्या भासवून मृतदेह ठेवला लटकवून

प्रकल्पातील जलसाठा
काटेपूर्णा प्रकल्प - ७२.९१ दलघमी
वान प्रकल्प -३४.४९ दलघमी
मोर्णा प्रकल्प - ३२.८३ दलघमी
निर्गुणा प्रकल्प - १६.०७ दलघमी
उमा प्रकल्प - ४.७१ दलघमी
दगडपारवा प्रकल्प - ७.९० दलघमी
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Van Dam empty, 85 per cent water storage in Katepurna Medium projects are also at 50 per cent, small projects are also in full swing