कोरोनाची धास्ती अन् सल्ल्यांचा भडिमार, असा पळवा कोरोना दूर; समाजमाध्यमांवरील प्रयोग धोकादायक

Akola Washim Coronas threat Ansallas bombardment, run away Corona away; Experiments on social media are dangerous
Akola Washim Coronas threat Ansallas bombardment, run away Corona away; Experiments on social media are dangerous

वाशीम  ः कोरोना संक्रमणाच्या काळात समाज माध्यमांवर अनेक औषधी, अनेक काढे, गोळ्या घेण्याच्या सल्ल्यांचा भडिमार सुरू आहे. अनेकजण याचा प्रयोगही करतात मात्र, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय केलेले प्रयोग आरोग्यासाठी घातक ठरत आहे. शरीरस्वास्थ मजबूत असेल तर आपोआप रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मात्र ही रोगप्रतिकारक शक्ती कोणतेही औषध घेतल्याने तत्काळ वाढत नाही, ही बाब डॉक्टर्स व आहारतज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आली आहे.

कोरोनाच्या प्रसाराचा वेग वाढत असताना समाजमाध्यमांवर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सल्ल्यांचा रतिब सुरू झाला आहे. काही सल्ले योग असले तरी प्रत्येक नागरिकाला वयोमानानुसार तो सल्ला लागू पडणे शक्य नाही. यासंदर्भात ‘सकाळ’ ने आहारतज्ञ प्रा. मेघा देशमुख व प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीपक ढोके यांच्याशी संवाद साधला. या संवादातून प्रतिकारशक्ती व कोरोना तसेच विविध वयोगटानुसार आहार या बाबी ठळकपणे समोर आल्या आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आयुर्वेद शरिरस्वास्थाची गुरूकिल्ली - डॉ. दिपक ढोके
सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली तरच कोरोनाचा संसर्ग होतो. मात्र हा संसर्ग होवू नये यासाठी व मानवी शरीर निरोग राहावे यासाठी हजारो वर्षापासून भारतीय आयुर्वेदशास्त्र जगासाठी वरदान ठरले आहे. सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये समाजमाध्यमांवर फिरणारे काढे व झाडपाल्याच्या औषधाचे संदेश कृतीत आणणे धोकादायक ठरू शकते. सर्वप्रथम रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर, संतुलित आहार, आठ तास झोप, व्यायाम, प्राणायाम याबाबी आवश्यक आहेत. यामुळे चयापचय क्रिया चांगली राहून रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मात्र कोरोनावर लक्षणावर आधारित उपचार करावा लागत असल्याने आयुष काढा प्रत्येक वयोगटासाठी वेगळा वापरावा लागणार आहे. व्यक्ती परत्वे स्वास्थ बदलत असल्याने सर्व वयोगटासाठी एकच औषध वापरणे धोकादायक ठरू शकते. काढा, वटी वापरतांना तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावा लागणार आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळी, जेष्ठमध, आडूळसा, गुळवेल, तुळस, अश्वगंधा इत्यादींचा समतोल वापर करणे, गरम पाणी पिणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे, मात्र हे सर्व तज्ञांच्या सल्ल्याने घेेणेे आवश्यक आहे.

भारतीय आहार सर्वोत्तम - डाॅ. मेघा देेेेशमुख
कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये शरीरस्वास्थ निरोगी असेल तर कोणताही आजार सहजा होत नाही. मात्र शरीर निरोगी राखायचे असेल तर आपण आहार काय घेतो याला महत्व आहे. भारतीय आहार आयुर्वेदावर आधारलेला आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती एकदम वाढत नाही त्यासाठी विविध जीवनसत्वयुक्त आहार घेतला पाहिजे. वृध्दांनी सहज पचेल असे अन्न सेवन करावे. ‘क’ जीवनसत्वासाठी आहारामध्ये लिंबु, संत्री, घरचे दही, ताक, मोड आलेली कडधान्य आहारात समाविष्ठ असावी. आंबट पदार्थ खाण्याने सर्दी, खोकला होतो हा गैरसमज आहे. उलट आंबट पदार्थातून रोगप्रतिकार शक्ती वाढते. काही काढ्यांमध्ये उष्ण पदार्थ असतात. मात्र आहारामध्ये या मसाल्यांचा पदार्थांचा समतोलपणे वापर केल्यास शरीरस्वास्थ निरोगी राहते. दररोज साधे व गरम अन्न, हळद, गवती चहा, लवंग यांचा वापर करणे गरजेचे आहे. हळद, गुळ व मिठ यांना एकत्री करून साजुक तुपाच्या गोळया बनवून त्या चघळल्याने घशातून संसर्ग कमी होतो. लहान मुलांना दुधामध्ये चिमुटभर हळद टाकून दिले तर लहान मुलांमध्येही रोगप्रतिकारशक्ती वाढते. रोजच्या आहारात स्वच्छ धुतलेल्या हिरव्या भाज्या, कडधान्य यांचा समावेश केला तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com