लोकशाहीत असले प्रकार क्लेषदायक - आमदार राजेंद्र पाटणी

Akola Washim Marathi News The type of democracy is painful MLA Rajendra Patni
Akola Washim Marathi News The type of democracy is painful MLA Rajendra Patni

वाशीम  : शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद होवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. या विकोपामुळे एकच खळबळ उडाली. वाशीम यवतमाळच्या सेनेच्या खासदार भावना  गवळी  आणि  कारंजा  मतदार  संघाचे भाजपचे  आमदार राजेंद्र पाटणी  यांच्या  मधील राजकीय वैर तसं जूनेच.  

मात्र ,वाशीमच्या जिल्हा नियोजन भवन येथे आज (ता.26)  जिल्हा आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सगळे लोकप्रतिनिधी  या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित  राहणार होते.  त्यापूर्वी  विकास कामात अडथला  निर्माण करून  शिवसेनेने  आणलेल्या  विकास  कामाला  बाधा  निर्माण का करता  म्हणत,  खासदार  भावना  गवळी आणि आमदार राजेंद्र  पाटणी  आमने सामने  आले  आणि  तू तू मै मै झाली.

या दरम्यान  शिविगाळ झाली.  तर शिवसेनेच्या   कार्यकर्ते  आमदार पाटणी  यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने वाद निवळला.  आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम पोलीस ठाण्यात खासदार भावना गवळी यांनी धमकी दिल्याची  तक्रार दाखल केली.  

 आता दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदामध्ये आमदार पाटणी यांनी विकास कामे अडविले नसल्याचा दावा केला तर, विकास कामांमध्ये अडथळा आणला तर जनतेसाठी अडवणुकीचा समाचार घेणे ही आमची संस्कृती असल्याचा दावा खासदार गवळी यांनी केला आहे.

याबाबत आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील विकासकामांना आपण कधीच विरोध केला नाही. याऊलट विकास कामांसाठी सरकार सोबत प्रशासनासोबत भांडत आलो.

परंतु, खासदार भावना गवळी यांनी मंगळवारी जी भूमिका घेतली ती असमर्थनीय तेवढीच क्लेषदायक आहे. असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केले. खासदार गवळी व आमदार पाटणी यांच्यातील वाद व पोलसि तक्रारीनंतर बुधवारी (ता.२७) आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार पाटणी पुढे म्हणाले की, मागील दोन दशकापासून आपण जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहोत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच नेत्यांच्या विरोधात मी निवडणुका लढलो. आमचे आपसात काही राजकीय मतभेद असतीलही परंतु, अशी व द्वेषी भूमिका मी किंवा अन्य कुणी घेतली नाही. परंतु खासदार भावना गवळींचे हे कृत्य असंसदीय व निंदनीय आहे.

खासदार गवळींनी माझ्या विरोधात केलेली तक्रार धादांत खोटी असुन त्यात कुठलीही सत्यता नाही खरतर खासदार गवळी ह्याच विकास कामांना अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोपही शेवटी आमदार पाटणी यांनी केला. यावेळी भाजपचे आमदार लखन मलिक, भाजयुमोचे राजू पाटील राजे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर, अकोला)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com