esakal | तळीरामांचा उच्छाद,निर्धारित वेळेनंतरही दारूची दुकाने सुरूच!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Washim News Liquor shops continue even after scheduled time!

शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही येथील दारूची दुकाने तसेच वाशीम नाक्यावरील देशी दारूचे दुकान सुरू राहत आहे. मुख्य रस्त्याला लागून वर्दळीच्या ठिकाणी हे दुकान असल्यामुळे महिलांसह इतर प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे.

तळीरामांचा उच्छाद,निर्धारित वेळेनंतरही दारूची दुकाने सुरूच!

sakal_logo
By
महादेव घुगे

रिसोड (जि.वाशीम) /अकोला : शासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही येथील दारूची दुकाने तसेच वाशीम नाक्यावरील देशी दारूचे दुकान सुरू राहत आहे. मुख्य रस्त्याला लागून वर्दळीच्या ठिकाणी हे दुकान असल्यामुळे महिलांसह इतर प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील काही महिने लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. परंतु टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही अटी व शर्ती घालून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा- या सापाच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नाही येणार, पण ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड असण्याचं कारण तरी काय?.

सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत बाजारपेठ व दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु या निर्धारित वेळेनंतरही येथील वाशीम नाक्यावरील देशी दारूचे दुकान सुरू राहते. हे दुकान मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे या ठिकाणी भोकरखेडा, वाडीरायताळ, मोहजा इंगोले येथे वाहतूक करणारे प्रवासी वाहने उभी असतात.

बापरे! जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी, कर्मचारी क्वारंटाईन

याठिकाणी असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे तळीरामांची मोठी वर्दळ व उच्छाद असतो तसेच याच ठिकाणी रस्त्यावर उघड्यावरच मास विक्री केली जाते. याचा मोठा त्रास महिला व प्रवाशांना होत आहे.

बँकेला अंधारात ठेवून विकल्या शेळ्या, कर्ज घेतल्यानंतर १९ लाखांने फसवणूक

काही तळीराम तर या ठिकाणी उभ्यानेच लघुशंका ही उरकतात, त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)