धक्कादायक; पोलीस पाटलाचा अल्पवयीन मुलावर गोळीबार

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 10 February 2021

 वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी एका 12 वर्षीय ओम गरकळ याच्यावर छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे.

रिसोड (जि. वाशीम) : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चाकोली येथील पोलीस पाटील गोविंद गरकळ यांनी एका 12 वर्षीय ओम गरकळ याच्यावर छऱ्याच्या बंदुकीची गोळी झाडून जखमी केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील चाकोली येथिल पोलिस पाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी ता.8 फेब्रुवारी सायंकाळी 6:15 वाजता अल्पवयीन मुलगा ओम जगदिश गरकळ वय 12 वर्षे हा दुकाणावर चहा पुडा आनायला जात आसतांना पोलिस पाटील गोविंद गरकळ याने शेतकरी बंदुकिने छऱ्ऱ्याचा वार करून जखमी केले.

हेही वाचा - भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

आशा प्रकारची तक्रार दिलीप रामराव गरकळ वय 31 वर्षे यांनी रिसोड पोलिस स्टेशन ला केली असुन 324 कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास बिट जमादार अनिल कातडे करीत आहेत.

 शेतातील वन्यप्राण्या पासुन पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बंदुकिचा अनेक शेतकरी वापर करतात परंतु चाकोली येथिल पोलिस पाटील गोविंद गरकळ यांनी वन्यप्राण्या ऐवजी थेट एका   अल्पवयीन 12 वर्षांच्या ओम गरकळ या मुलाच्या उजव्या दंडावर शेतकरी बंदुकिने छऱ्ऱ्यांचा वार करून जखमी केल्याची घटना ता 8 फेब्रुवारी ला सायंकाळी घडली.

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेची गावात चर्चा होताच पोलिस पाटील गोविंद गरकळ याने आपली शेतकरी बंदुक लगेच मोडुन टाकली हे विशेष ता.8 फेब्रुवारी ला सायंकाळी ओम गरकळ या जखमी मुलाला घेऊन रिसोड पोलिस स्टेशन ला लेखी तक्रार दाखल झाली आहे.

हेही वाचा - मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

अल्पवयीन मुलावर आशा अमानवी कृत्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांच्या नेतृत्वाखाली बिटजमादार अनिल कातडे करीत आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Washim News Police patil shoot a minor