esakal | मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Cyber Crime News Online money laundered from bank account

ऑनलाइन फसवणुकीच्या दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.  बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन रक्कम काढण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली आहे. 

मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : ऑनलाइन फसवणुकीच्या दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.  बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन रक्कम काढण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली आहे. 

अंकुश गजानन गावंडे रा. सांगवी खूर्द यांना ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका अनोळखी नंबरहून फोन आला की त्यांना मोफतमध्ये बजाज फायनान्सचे क्रेडीट कार्ड मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलमध्ये क्वीक सपोर्ट नावाचे अप्लीकेशन डाऊनलोड करावे लागणार व त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून फायनान्सच्या अकाऊंटमध्ये पाच रुपये टाकावे लागणार. 

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

अंकुश यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार अप्लीकेशन डाऊनलोड केले. व बजाज फायनान्सच्या अकाऊंटमध्ये पाच रुपये टाकले असता त्यांच्या अकाऊंटमधून ३५ हजार रुपये रक्कम काढण्यात आली. दुसरी तक्रार विपुल पाठक (रा. डाबकी रोड) यांनी ६ जानेवारी रोजी केली होती. त्यांना एका अनोळखी नंबरहून फोन आला होता की त्यांना पेटीएम या ऑनलाइन पोर्टलवर चार हजार रुपये कॅशबॅक आले आहे.

हेही वाचा - नीमा अरोरा  महानगरपालिकेच्या पहिला महिला आयएएस आयुक्त

 त्यासाठी तुमचे पेटीएम अकाऊंटवर आलेल्या लिंकवर क्लीक करून तुमचा पासवर्ड टाका, असे सांगितले. पाठक यांनी तसे केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून ३० हजार रक्कम काढली होती. 

हेही वाचा -बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

दोन्ही तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी पेटीएम आणि बजाज फायनान्स याचा सखोल तपास केला असता रक्कम परत करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पीएसआय दीपक सोळंके , अतुल अजने, गोपाल ठोंबरे , आशिष आमले, राहूल देविकर यांनी केला.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image
go to top