esakal | पाणीपुरवठ्याबाबत चाललंय काय?
sakal

बोलून बातमी शोधा

akola

Akola : पाणीपुरवठ्याबाबत चाललंय काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील सर्वांत मोठा जलप्रकल्प काटेपूर्णामधून दररोज लाखो घ.न.मीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच प्रकल्पातून अकोलेकरांना पाणीपुरवठा होत असतानाही कुठे तीन दिवसा आड तर कुठे आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्याबाबतच्या अनियमिततेवर महापौरांसह नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा होतो. गेले तीन वर्षांपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहे. त्यामुळे सिंचनासोबतच पिण्यासाठीही मुबलक पाणी मिळत आहे. असे असले तरी महानगरपालिका जलप्रदायक विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा अकोलेकरांना फटका बसत आहे. केवळ पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या जलप्रदाय विभागाने मुलबक पाणी असतानाही अकोलेकरांना नियमित व आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, ते तर सोडाच पण शहरात कुठे तीन दिवसा आड तर कुठे आठवड्यातून एकदाच पुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे कुठेच पालन होताना दिसत नाही. त्यामुळे जनेतसोबच नगरसेवकही त्रस्त झाले आहेत.

दर दुसऱ्या दिवशीपाणीपुरवठ्याबाबत विचार

काटेपूर्णा प्रकल्‍पात पाण्‍याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. दररोज मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे शहरातील संपूर्ण भागातील पाणी पुरवठा दर दुसऱ्या दिवशी करण्याबाबत विचार सुरू आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश महापौरांनी जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांना दिला आहे.

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय!

महापौरांनी व्यक्त केली नाराजी

महापौर अर्चना जयंत मसने यांनी शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोमवारी माजी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी, स्‍थायी समिती सभापती संजय बडोणे, माजी नगरसेवक जयंत मसने, नगरसेवक तुषार भिरड, अमोल गोगे यांच्‍या उपस्थित जलप्रदाय विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची सूचना केली.

जोडणीबाबत गांभीर्य नाही

अमृत अभियान अंतर्गत होत असलेल्‍या कामांचा तसेच शहरातील होत असलेला पाणी पुरवठ्या बाबत प्रशासन गांभिर्याने काम करताना दिसत नाही. अमृत अभियान अंतर्गत नव्‍याने उभारण्‍यात आलेले जलकुंभा मार्फत पूर्ण क्षमतेने शहरात पाणी पुरवठा व्‍हावा यासाठी जलकुंभांच्‍या जलवाहिनी अद्याप जोडणी करण्यात आली नाही. मोठे व किरकोळ लिकेजेसचे कामे तातडीने केली जात नाही. व्‍हॉल्‍व बदलणे, जलवाहीनी जोडणी यासारखी अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे तातडीने करण्याची सूचना महापौरांनी केली.

loading image
go to top