असा असेल यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा,  जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीचा आढावा

सुगत खाडे  
Wednesday, 12 August 2020

राजधानी दिल्लीसह देशभरातील नागरिक प्रजासत्ताक दिन असो की स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असतात. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची अशी असेल रुपरेषा.

अकोला ः राजधानी दिल्लीसह देशभरातील नागरिक प्रजासत्ताक दिन असो की स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असतात. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची अशी असेल रुपरेषा.

आगामी शनिवारी (ता. १५) भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन समारंभ हा सामाजिक अंतर राखून साजरा केला जावा, यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी (ता. ११) दिले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करण्यासंदर्भात मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांना स्वातंत्र दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध एका परिपत्रकाद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती दिली.

जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ९.०५ वाजता होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेपर्यंत अन्यत्र कुठेही कार्यक्रम घेण्यात येऊ नये, अशी सुचनाही देण्यात आली आहे.

सामाजिक अंतर राखून कार्यक्रमाचे आयोजन
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम हा सामाजिक अंतर राखण्याबाबत गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन साजरा करावा. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या साऱ्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
(संपादन- विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola will be this years Independence Day celebrations, a review of preparations under the chairmanship of the District Collector