केल्याने होत आहे रे आधी...महिला बचत गटाच्या ‘आट्या’ला  मिळाली ‘चवदार’ ओळख!

विवेक मेतकर
Monday, 3 August 2020

महिलांच्या आर्थिक सक्षमिकरणाबाबत सर्वत्र गप्पांचा बाजार भरला असताना अकोला जिल्ह्यातील कौलखेड जहाँगीर येथील कृषी उत्पादन कंपनीने पुढाकार घेत महिला बचत गटातील सदस्यांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे.

अकोला  ः महिलांच्या आर्थिक सक्षमिकरणाबाबत सर्वत्र गप्पांचा बाजार भरला असताना अकोला जिल्ह्यातील कौलखेड जहाँगीर येथील कृषी उत्पादन कंपनीने पुढाकार घेत महिला बचत गटातील सदस्यांच्या हाताला रोजगार मिळवून दिला आहे.

प्राथमिक स्वरुपात मल्टीग्रेट आटा तयार केल्यानंतर आता या आट्यापासून वेगवेगळे चवदार पदार्थ तयार करून त्याला नवी ओळख मिळवून देण्याचे काम सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गालगत कौलखेड जहाँगीर हे छोटेसे गाव. येथील गावकऱ्यांनी एकत्र येत आधुनिक किसान प्रोड्यूसर्स कंपनी सुरू केली. महाराष्ट्र शासनाच्या आत्म प्रकल्पांतर्गत ही कंपनी सुरू करण्यात आली.

त्यात शेतकरी महिला बचत गटाचा पुढाकार अधिक. महिलांचा सहभाग असल्याने पाक कौशल्यही आले. त्यातून मल्टीग्रेन आट्याची निर्मिती झाली.

आयुर्वेदिक आहार विज्ञानाच्या आधार घेत वेगवेगळ्या डाळी व धान्याचा वापर करून पाचक व पोषक आटा तयार झाला. आट्यापासून तेवढेच रुचकर पदार्थ तयार करण्यासाठी बचत गटातील महिलांचीच पाककला कामी आली.

मल्टीग्रेन आट्यापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार होऊ लागले. सुवारतीला तयार झालेल्या सेहत आट्यातून तेवढेच पोषक व त्याहून अधिक रुचकर पदार्थ महिला बचत गट बाजार घेवून आले.

लॉकडाउनमुळे बहिणींचा हिरमोड, रक्षाबंधनच्या एक दिवस आधी टाळेबंदीमुळे बाजारात सन्नाटा

मल्टीग्रेन आट्यापासून तयार झालेली पोळी, पुरी, पालक पुरी, पराटा, आयता, खरमखुरम शंकरपाडे तयार झाले. एवढेच नव्हे तर चवदार उत्तपाही तयार झाला.

महिला बचत गटाच्या महिलांनी स्वयंपाक घरातील पाककलेतून कल्पकता वापरत अप्रतिम चवदार पदार्थ तयार केले. ओवा, जिरे, पालक, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, लसून व सिंमला मिरचीचा वापर करून त्या पदार्थाला वेगळी ओळख दिली. कोरोनामुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने राखी पौर्णिमेच्या पर्वावर महिला बचत गटाने ही भेट दिली आहे.
 
सणसुदीला मिळाला आधार
कोरोनामुळे हॉटेल बंद असल्याने ग्राहकांपर्यंत चमचमित पदार्थ पोहोचविण्यासाठी महिला बचत गटाने प्रयत्न सुरू केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना सणसुदीच्या दिवसांचा आधार मिळाला. खास रक्षाबंधनापासून त्यांनी हे पदार्थ तयार करणे सुरू केले. त्याला व सेहत आट्याला ग्राहकांनीही पसंती दर्शवून महिलांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Womes Savings Groups Ata is known as Tasty!, an initiative of an agricultural production company to empower women financially