वारी हुनामानच्या डोहात बुडाला अकोल्याचा युवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth Drowned

अकोला : वारी हुनामानच्या डोहात बुडाला युवक

अकोला - जिल्ह्यात बुधवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. तेल्हारा तालुक्यातील वारी हुनामान येथील मामा भाच्याच्या डोहात अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरातील युवकाचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे पातूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कापशी तलाव परिसरात दोन अनोळखी मृतदेह आढळले. एक मृतदेह कापशी तलावात आढळला तर या घटना स्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आला.

तेल्हारा (जि. अकोला) - गेल्या वर्षानुवर्षे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मामा भाच्याच्या डोहात शेकडो जणांना बुडून मृत्यू झाला असून, शासनाकडून तसेच नागरिकांकडून दक्षता घेण्यासाठी सांगण्यात येते. मात्र त्याला कोणीही जुमानत नाही. अशीच घटना बुधवारी पुन्हा एकदा येथे घडली. अकोल्यातील युवक दर्शनासाठी वारी हनुमान येथे आले होते. काही मित्र मंदिराकडे होते तर काही मामा भाच्याच्या डोहाकडे अंघोळ करण्यासाठी गेले असता राज गुडदे (वय १९ वर्ष ) रा. सिंधी कॅम्प अकोला हा अंघोळ करीत असताना बुडाला. याबाबत मित्रांनी आरडाओरड केली. तेव्हा आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सदर युवक बुडाला होता. याबाबत वारी येथील सरपंच शिवा पतींगे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती दिली. याबाबत पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.

कापशी परिसरात आढळले दोन अनोळखी मृतदेह

पातूर - कापशी तलाव येथील तलाव व विहिरीमध्ये दोन अनोळखी इसमाचे मृतदेह आढळून आले. या संदर्भात पातुर पोलिस स्टेशनला कापशी तलाव येथील पोलिस पाटील तेजराव चतरकर यांनी माहिती दिली. पातुर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यांने दोन्ही मृतदेह बाहेर काढून अकोला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवविले आहे.या घटनेबाबत नागरिकांकडून तर्कवितर्क लावले जात आहे. दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. एक मृतदेह तलावामध्ये तर दूसरा मृतदेह सुनील पोरे यांच्या शेतातील विहिरीत आढळला. दोन्ही ठिकाणचे अंतर जवळपास एक ते दीड किलोमीटर आहे. याबाबत पुढील तपास पातुर पोलिस करीत आहेत.

Web Title: Akola Youth Drowned In Pool

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top