

Rohit Shetty House Firing Case: Responsibility Claimed by Bishnoi Gang on Social Media
Sakal
अकोला: मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित शुभम लोणकर याने ही जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याने जिल्ह्यातही एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा जिल्हा पोलिसांकडून अधिक तपास सुरू झाला आहे.