
आरोग्य सेविकांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार बहाल
अकोला : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार देवून गुरुवारी (ता.७) गौरव केला.जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवन येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून फ्लोरिंग नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता. ७) करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड तसेच जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. मनीष शर्मा, हीरासिंग राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेविका, नर्स, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जि. प. नर्सेस संघटनेकडून पाठपुरावा
आरोग्य विभागात जीवाची बाजी लावू कार्य करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या हक्काच्या पुरस्कार बाबत शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्या नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून पुरस्कार घेण्याबाबत प्रशासनाला भाग पाडले.
यांना मिळाला पुरस्कार
आरोग्य सेविका मधून प्रथम पुरस्कार बाळापूर तालुक्यातील करुणा इंगळे यांना देण्यात आला. द्वितीय पुरस्कार संगीता जाधव यांना तसेच तृतीय पुरस्कार ज्योती सोळंके यांना देण्यात आला व मेश्राम आरोग्य सेविका यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच पातुर तालुक्यातील चोरमारे, आरोग्य पर्यवेक्षिका किरडे, सविता केदार यांना आरोग्य पर्यवेक्षिका पुरस्कार देण्यात आला.
Web Title: Akola Zilla Parishad Health Workers Awarded Florence Nightingale Award
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..