esakal | हॅलो, आवाज येतोय का माझा?, सभा होणार ऑनलाईन, सत्ताधाऱ्यांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Zilla Parishad Panchayat Samiti Meeting VC

जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वसाधारण सभा, विषय समित्यांच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यात याव्यात, असा आदेश ग्राम विकास विभागाने मंगळवारी (ता.२५)दिला.

हॅलो, आवाज येतोय का माझा?, सभा होणार ऑनलाईन, सत्ताधाऱ्यांचा विरोध

sakal_logo
By
सुगत खाडे

अकाेला :  जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्वसाधारण सभा, विषय समित्यांच्या बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यात याव्यात, असा आदेश ग्राम विकास विभागाने मंगळवारी (ता.२५)दिला.

त्याला अकोला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने विराेध केला. दुसरीकडे जिल्हा परिषद शासनाच्या आदेशाचे पालन करण्यावर ठाम आहे. त्यामुळे सत्ताधारी शासनाकडे धाव घेणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. जि.प.मध्ये दाेन कर्मचाऱ्यांना काेरानाची बाधा झाली आहे. जि.प.मध्ये काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठीच्या उपाय याेजनांना होताना दिसत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यातच जि.प. व पं.स.च्या सभांना ग्रामीण भागातून येणारे सदस्य आणि अधिकारी सर्वाधिक आहेत. त्यामुळे एकूणच स्थिती लक्षात घेता शासनानेच सभा, विषय समित्यांच्या बैठका व्हीसीद्वारेच घेण्याचा आदेश दिला आहे.
 
या सभा कशा हाेणार?
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा २ सप्टेंबर राेजी आणि १४ सप्टेंबर राेजी सर्व साधारण सभा आयाेजित करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या सभेच्या नाेटीसही जारी करण्यात आल्या असून, सर्व साधारण सभेच्या नाेटीस तयार करण्यात येत आहेत. सर्व साधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नयाेजन भवनात हाेण्याचे नियाेजन आहे. त्यानुसार जि.प.कडून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)