
अकोला : सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा व शेतमालाला रास्त भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबायचे नाव घेईना. वऱ्हाडातील समस्या निराकरणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा.डॉ. संजय खडक्कार यांनी केली आहे.