amol mitkari
sakal
अकोला - नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारमधील आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या सन २०२५ च्या विधेयक क्रमांक ९३ ला तीव्र विरोध दर्शवला. सरकारमध्ये सहभागी असतानाही शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचणाऱ्या कोणत्याही कायद्याला विरोध करणार असल्याची भूमिका त्यांनी सभागृहात स्पष्ट केली.