Anandacha shidha : आनंदाचा शिधा पोहोचला; गणेशोत्सव होणार गोड!

लवकरच सुरू होणार वाटप; ९५ टक्क्यांवर शिधा दाखल
anandacha shidha
anandacha shidha sakal

अकोला - पुढील आठवड्यापासून सर्वत्र गौरी-गणपतीचे आगमण होईल. त्यामुळे सर्वत्र नवचैतन्य, उत्साह दिसून येईल. या उत्सावात गरीबांना सुद्धा सहभागी होता यावे यासाठी जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच गोदामातून आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचला आहे. लवकरच त्याचे वाटपही सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा वेळेपूर्वीच लाभार्थ्यांच्या घरात आनंदाचा शिधा पोहोचेल.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, चनाडाळ, साखव व एक लीटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिधाजिन्नस संच

‘आनंदाचा शिधा’ गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर आनंदाचा शिधा एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येईल. पात्र शिधापत्रिकाधारकाला ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरण करण्यात येईल.

anandacha shidha
Beed : बनावट दुधाचा पर्दाफाश ब्रह्मगाव, हाजीपूरच्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई २७९४ लिटर दूध नष्ट

याबाबतचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत शासनादेश जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख २७ हजार ६० रेशनकार्डधारक आनंदाच्या शिधासाठी पात्र ठरले आहेत. याबाबतची नोंद पुरवठा विभागाने शासनाकडे आधीच केली होती. दरम्यान आता पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाचा शिधा पोहोचला आहे. त्याचे वाटपही लवकरच होणार आहे.

यंदा वेळेआधीच वाटप

राज्य शासनाने गत वर्षी दिवाळीला पहिल्यांदा आनंदाचा शिधाचे वाटप केले होते. त्यानंतर गुढीपाडवा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला. दोन्ही वेळ जिल्ह्याला सुरुवातीला अपुऱ्या प्रमाणात धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आला नाही. प्राप्त झालेला माल एकूण मागणीच्या तुलनेत अपुरा मिळाल्याने आनंदाच्या शिधाचे वाटप जिल्ह्यात वेळेवर होऊ शकले नाही. दरम्यान यंदा मात्र आनंदाचा शिधा दाखल झाल्याने त्याचे वाटपही लवकरच सुरू होईल व वेळेत शिधा लाभार्थ्यांच्या घरात पोहोचेल.

anandacha shidha
Nanded News : जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

एकूण पात्र लाभार्थी संख्या ः चार लाख १२ हजार ५०१

शिधाजिन्नस संचांची मागणी ः तीन लाख २८७

प्राप्त संच (पामतेल - दोन लाख ९८ हजार ८८७, चनाडाळ - दोन लाख ८६ हजार १२३, साखर - दोन लाख ८० हजार ६२३, रवा - दोन लाख ९५ हजार ७२९)

anandacha shidha
Akola : पूर्णेच्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक

जिल्ह्यातील तीन लाखावर लाभार्थ्यांसाठी आनंदाच्या शिधाची मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांसाठी शिधा संच प्राप्त झाले आहेत. लवकरच आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात येईल.

- बी.यू. काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com