Akola News : आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसींना जिद्दीने पेटून उठावे लागेल - अंजलीताई आंबेडकर

ओबीसी महासंघाचा एल्गार मोर्चा जिल्हा कार्यालयावर
anjalitai ambedkar over obc reservation obc elgar morcha akola maratha reservation
anjalitai ambedkar over obc reservation obc elgar morcha akola maratha reservationSakal

Akola News: ओबीसीच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका. मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतुद करण्यात यावी. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय्य जनगणना होणे आवश्यक आहे.

जनगणना करून ओबीसींचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी सरकारला बाध्य करण्याकरिता ओबीसी समाजाने जिद्दीने पेटून उठले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्या वतीने जवळपास ३५ समाज संघटनांना सोबत घेऊन काढण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मोर्चाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.

anjalitai ambedkar over obc reservation obc elgar morcha akola maratha reservation
Akola News : २१ आरोग्य उपकेंद्र मंजुरीचा प्रस्ताव धूळखात; हिवाळी अधिवेशनात तरी प्रश्न मार्गी लागेल काय?

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात ओबीसीतील विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दुपारी १ वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदाना जवळून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झाला.

यावेळी मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाला माळी समाजाचे सुभाष सातव,

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बालमुकुंद भिरड, कार्याध्यक्ष ॲड. संतोष रहाटे, प्रो. डॉ. संतोष हुसे, बाराबलुदेदार संघटनेचे अनिल शिंदे, अत्यल्प समाज संघटनेचे गोपाल राऊत, नाव्ही समाजाचे गजानन वाघमारे, वंचितचे नेते प्रदीप वानखडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आदींनी संबोधित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com