esakal | आणखी एकाचा मृत्यू तीन नवे पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Another died of three new positives

आणखी एकाचा मृत्यू तीन नवे पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे बाधित गुरुवारी (ता. १५) जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळले व एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यासोबतच ८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Another died of three new positives)

कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. १५) जिल्ह्यात ५७५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५७३ अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत एक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांमध्ये तीन नव्या रुग्णांची भर पडली. त्यासोतबच उपचार घेत असताना एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १ हजार १३२ झाली आहे. रुग्णालयातून गुरुवारी आठ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. आता जिल्ह्यात ४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

हेही वाचा: Video: शेतकऱ्यांचा सामुहिक आत्महत्येचा इशारा; २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७७११
- मृत - ११३२
- डिस्चार्ज - ५६५३१
- ॲक्टिव्ह रुग्ण - ४८

संपादन - विवेक मेतकर

Another died of three new positives

loading image