esakal | शेतकऱ्यांचा सामुहिक आत्महत्येचा इशारा; २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Video: शेतकऱ्यांचा सामुहिक आत्महत्येचा इशारा; २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Video: शेतकऱ्यांचा सामुहिक आत्महत्येचा इशारा; २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गजानन काळुसे

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.परंतु दुसऱ्या बाजूला लघु पाटबंधारे विभाग बुलडाणा यांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील राहेरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या २० हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी होत आहे. खडकपूर्णा धरण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची व्यवस्था होण्यासाठी डावा व उजवा कालव्याची निर्मिती करण्यात आली होती.त्यानंतर परंतु सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना उजव्या कालव्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होत असल्यामुळे शेतकरी वैतागून केलेला आहे.त्यामुळे राहेरी येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई द्या अन्यथा सामूहिक आत्महत्येचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.लघु पाटबंधारे विभाग बुलडाणा प्रकल्प यांना वर्षाभरापासून वेळोवेळी निवेदन व तोंडी माहिती सुध्दा जाणीव दुर्लक्ष करत असल्यामुळे अधिकारी वर्ग करतात तरी काय ? अशा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

हेही वाचा: वाळू माफियांची तहसील कर्मचार्‍यांना धक्काबुक्की

राहेरी खुर्द येथील गट क्रमांक २१२,२९२, २८८ ,२८७ मधील शेताजळून २००८ मध्ये उजव्या कालव्यांची निर्मिती करण्यात आली होती.परंतु कालांतराने लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडून वेळोवेळी देखभार होत नसल्यामुळे कालवा बुजन जात असल्यामुळे त्यामुळेच पावसांचे पाणी हे दरवर्षी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.राहेरी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास ४ तर ५ फुटांपर्यत पाणी साचले आहे.त्यामुळे यावर्षी लागवड केलेल्या सोयाबीन व कापसांची लागवड केलेली आहे, परंतु पाऊस जास्त पडल्यामुळे उजव्या कालव्याचे पाणी हे थेट शेतकऱ्यांच्या शेतात केल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ४ ते ५ फुटापर्यंत शेतात पाणी असल्यामुळे पिके सडून जावून खराब होवून नष्ट होणार आहे. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावेळी अशी मागणी शेतकरी उध्दव घुगे,अर्जुन घुगे,श्रीधर घुगे,पंढरीनाथ घुगे,शिवाजी घुगे,शांताबाई घुगे,रमेश डोईफोडे,धनंजय डोईफोडे, शिवाजी घुगे आदींनी केली आहे.

हेही वाचा: राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांची लूट

शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा :- लघु पाटबंधारे विभाग बुलडाणा अंतर्गत तालुक्यातील राहेरी खुर्द येथील उजवा कालव्यामुळे दरवर्षी शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.अनेक वेळेस निवेदन तोंडी तक्रार दिल्या आहेत.परंतु याकडे संबधीत अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपयोजना केल्या जात नाही. संबधीत ठेकेदारांने कालव्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे शेतामध्ये पाणी जात आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकदार यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा नुकसान झालेले शेतकरी सामुहिक आत्महत्या करणार आहे.

- उद्धव अर्जून घुगे, शेतकरी राहेरी खुर्द ता.सिंदखेड राजा

संपादन - विवेक मेतकर

Damage to crops on 20 hectares due to negligence of Irrigation Department

loading image