esakal | नवीन पिढीवर संगणकाचा प्रभाव, डिजिटल शिक्षणात हरवतेय हस्ताक्षराची कला
sakal

बोलून बातमी शोधा

The art of handwriting is also disappearing day by day due to the influence of computer on the new generation

संगणक व भ्रमणध्वनीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे हस्ताक्षर वळणदार अर्थातच सुंदर येईनासे झाले आहे. परिणामी डिजिटल शिक्षणामुळे सुलेखनाची कलाही नाहीशी होऊ लागली आहे.

नवीन पिढीवर संगणकाचा प्रभाव, डिजिटल शिक्षणात हरवतेय हस्ताक्षराची कला

sakal_logo
By
संतोष गिरडे

शिरपूर जैन (वाशीम) : अतिसुंदर हस्ताक्षर काढण्याची कला ज्याला प्राप्त असते, त्याचे सर्वजण कौतुक करत असतात. याउलट ज्याचे हस्ताक्षर अतिशय खराब असेल, त्याची प्रतारणा ही जास्त प्रमाणात केली जाते. आज घडीला सुंदर हस्ताक्षराची कलाही दिवसेंदिवस नाहीशी होऊ लागली आहे. खाजगी व प्राथमिक शाळांमधून देण्यात येणाऱ्या या डिजिटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे.

हे ही वाचा : शेतकऱ्याची सोयाबीन गंजी आगीत भस्मसात

संगणक व भ्रमणध्वनीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे हस्ताक्षर वळणदार अर्थातच सुंदर येईनासे झाले आहे. परिणामी डिजिटल शिक्षणामुळे सुलेखनाची कलाही नाहीशी होऊ लागली आहे. सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्राथमिक शाळेपासूनच शिक्षण दिले जाते. बदलत्या काळाप्रमाणे आज बॉल पेन, जेल पेन ने फाउंटन पेनची घेतलेली जागा तसेच तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या प्रमाणातून आजच्या पिढीने संगणक व टॅबलेटला जवळ केल्याने सुलभ सुलेखनाशी नकळत हरकत घेतली आहे.

हे ही वाचा : अभियंत्यांस हातात फलक देऊन केले खड्ड्यात उभे राहून अनोखे आंदोलन

शाळा व्यतिरिक्त पेपरलेस कामकाज केले जात असल्याने ऑनलाईन व्यवस्थेमुळे कागद आणि पेन ने भावनिक नाते संपुष्टात आले आहे. संगणकाच्या सततच्या कामामुळे हस्ताक्षर खराब येत असल्याने लिखाणाकडे ही दुर्लक्ष होत आहे. पूर्वी सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजन विविध संस्था, सामाजिक संघटना तथा शाळेकडून केले जात असे.

मात्र बदललेल्या डिजिटल क्लासरूम व संगणक वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे सुंदर येण्याचे प्रमाण घटले आहे. तर पूर्वीच्या काळात दोन रेगी, तीन रेगी, चार रेगी वह्यातून देण्यात येणाऱ्या गृहपाठाचे ही प्रमाण कमी झाले आहे. खाजगी क्लासेसमध्ये शाळेतील सर्वच विषय शिकवले जात असल्याने शाळेतील शिक्षकही शाळेत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. 

संगणकाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यात येत असल्याने पाटी आणि पेन्सिल व पेन वापराचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मराठी प्रमाणे इंग्रजी हस्ताक्षर याबाबतही असेच आहे. बदलत्या काळानुसार आता शाळेतील शिक्षण पद्धतीतही सुधारणा झाली आहे. पूर्वी पाटी, पेन्सिलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र त्याचे प्रमाण कमी झाले असून, आज डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पाटी-पेन्सिल ऐवजी टेबलेट, संगणकाचा माऊस आला आहे. परिणामी आजच्या काळात संगणकाच्या वापरामुळे मूळची सुलेखनाची कलाही पार नाहीशी होऊ लागली आहे.
 
संपादन - सुस्मिता वडतिले