अकोला : वाळू घाटांचा फेर लिलाव

१३.१७ कोटींचा महसूल अपेक्षित; ई-लिलाव गुरुवारी; प्रक्रियेला गती
auction of sand ghat
auction of sand ghatsakal

अकोला : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू घाटांचा ई-लिलाव (e-auction)न झाल्याने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीने जोर पकडला. परंतु यावर्षी मात्र खनिकर्म विभागाने(Department of Mining) वाळू (sand)घाटांचा ई-लिलाव करण्याची तयारी व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील लिलाव योग्य ३० वाळू घाटांपैकी १० वाळू घाटांचा ई-लिलाव((e-auction) पार पडला आहे, परंतु उर्वरित २० वाळू घटांसाठी गुरुवारी (ता. २३) फेर ई-लिलाव होणार आहे. सदर लिलावातून जिल्हा प्रशासनाला १३ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नवीन वाळू निर्गती सुधारित धाेरण जाहीर केले होते. धाेरणानुसार वाळू गटास पर्यावरण अनुमती घेण्यापूर्वी खाणकाम आराखडा (माईनिंग प्लान) तयार करण्याचा निकष लावण्यात आला होता. २२ डिसेंबर २०१७ राेजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा या संबंधी आदेश दिले होते. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने आर्थिक वर्ष २०२१-२१ साठी जिल्ह्यातील लिलाव याेग्य वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करून वाळू घाटांच्या लिलावाच्या ई-लिलावासाठीची प्रक्रिया पार पाडली.

auction of sand ghat
पुणे : जिल्हा बँकेच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

सदर प्रक्रियेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात लिलाव योग्य वाळू घाटांसाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये एकही आक्षेप न मिळाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाने वाळू घाटांच्या ई-लिलावाची प्रक्रिया राबविली. ई-लिलावात जिल्ह्यातील लिलाव योग्य ३० वाळू घाटांपैकी १० वाळू घटांचा ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाला ५ कोटी २८ लाख ७३ हजार २१७ रुपयांचा महसूल सुद्धा मिळाला. परंतु अद्याप इतर २० घाटांचा ई-लिलाव न झाल्याने त्यासाठी फेर-लिलावाची प्रक्रिया २३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

९१ हजार ब्रास वाळूसाठा उपलब्ध

फेर ई-लिलाव होत असलेल्या २० वाळू घाटातून १३ कोटी १७ लाख ६५ हजार ३७८ रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाला आहे. सदर वाळू घाटातून ९१ हजार ६३१ ब्रास वाळू साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उत्पन्न देणाऱ्या वाळू घाटांवर कंत्राटदार लक्ष घेवून आहेत व ई-लिलावाची प्रतीक्षा करत आहे.

auction of sand ghat
चंद्रपूर : उड्डाणपुलावरून वाहन कोसळले; दोघे ठार, दोघे जखमी

सर्वाधिक वाळू घाट मूर्तिजापूर तालुक्यात

लिलाव योग्य २० वाळू घाटांपैकी सर्वाधिक १२ वाळू घाट हे मूर्तिजापूर तालुक्यात आहेत. तर अकोटमध्ये दोन, बाळापूर व तेल्हारा तालुक्यात प्रत्येकी दोन-दोन तर अकोला तालुक्यात एकच वाळू घाट आहे.

यापूर्वी ३४.८३ लाखांचा अधिक महसूल

यापूर्वी लिलाव झालेल्या दहा वाळू घाटांपैकी सात वाळू घाट हे पूर्णा नदीपात्रातील आहेत. दोन वाळू घाट पेढी व पूर्णा नदी पात्रातील आणि केवळ एक वाळू घाट मन नदी पात्रातील आहे. लिलाव करण्यात आलेल्या दहा वाळू घाटांतून ३४ हजार ३४६ ब्रास वाळू साठा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी खनिकर्म विभागाने ४ कोटी ९३ लाख ८९ हजार ५४८ रुपयांची किंमत निर्धारित केली होती. परंतु त्यापेक्षा ३४ लाख ८३ हजार ६६९ रुपयांचा अधिक महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com