
आता रात्री देखील होईल शवविच्छेदन : राजेश टोपे
अकोला : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रात्रीच्या शवविच्छेदन प्रश्नाला अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव जावेद झकरिया यांनी ही मागणी लावून धरली होती.
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच शवविच्छेदन करण्यात येत आहे. यामुळे दुपारनंतर अपघाती निधन झालेल्या मृतकावर सर्व लेखी प्रक्रिया करून शवविच्छेदन गृहात जाईपर्यंत सांयकाळी ६ वाजून जायचे. त्यामुळे याचा संबंधित नातेवाईकांना त्रास सहन करावा लागतो.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव जावेद झकरिया यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली व या मागणीचे एक निवेदन सादर केले. त्यांच्या मागणीवरून आरोग्य मंत्र्यांनी ही वेळ वाढवून रात्री शवविच्छेदन करण्यासाठी परवानगी देऊन तसे अकोल्याच्या डीनला फोन करून आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रात्री ही शवविच्छेदन होणार आहे.
Web Title: Autopsy Will Also Take Place At Night Rajesh Tope Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..