

Teacher Arrested for Molesting Five Students at Navegaon Primary School
sakal
योगेश फरफट
चान्नी : बाळापूर पोलिस उपविभागा अंतर्गत येणाऱ्या नवेगाव (बांध) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील एका शिक्षकाने याच शाळेत शिकणाऱ्या तब्बल पाच विद्यार्थ्यांनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला चान्नी पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.