Balapur October Heat : तूर, कपाशी ऑक्टोबर हीटच्या तडाख्यात ; पाणी विकत घेऊन सिंचनाची वेळ; दररोज १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च

Farmers Spend Up to ₹1,500 Daily on Irrigation : बाळापूरसह अकोला जिल्ह्यात ऑक्टोबर हीट आणि पावसातील दीर्घ खंडामुळे तूर व कपाशीच्या पिकांवर पाण्याचे संकट वाढले आहे.
Balapur October Heat

Balapur October Heat

esakal

Updated on: 

बाळापूर : मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच बाळापूर तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. पावसातील प्रदीर्घ खंड आणि वाढत्या तापमानामुळे शेतजमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, उभ्या पिकांवर पाण्याचे संकट गडद झाले आहे.

ऐन काढणीच्या काळात सोयाबीनचे नुकसान झाल्याने आता उर्वरित तूर आणि कपाशीची पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सिंचनासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांवर दररोज १५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

Balapur October Heat
Ajra Elephant AI Monitoring : हत्तींच्या हालचालींवर आता ‘एआय’चे लक्ष आजऱ्यात कार्यशाळा ; उपद्रव टाळणे शक्य, संगोपन केंद्राच्या जागेची पाहणी

यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही घट होत आहे. परिणामी, स्वतःच्या शेतात सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना इतरांकडून पाणी विकत घेऊन पिकांना जगवावे लागत आहे.

आधीच खरीप हंगामातील नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अतिरिक्त खर्च असह्य ठरत आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत.

सोयाबीनच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांची आशा आता तूर आणि कपाशीच्या उत्पादनावर टिकून आहे. मात्र, पावसाअभावी या पिकांची वाढही अडचणीत आली आहे. पिकांना आवश्यक ओलावा मिळावा यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. परंतु पाण्याची उपलब्धता कमी आणि सिंचनाचा खर्च वाढल्याने पिके वाचविण्याचे मोठे आव्हान आहे.

Balapur October Heat
Pune Teacher Graduate Election : ‘शिक्षक, पदवीधर’साठी हालचाली अजूनही थंडच अद्याप एकही अर्ज नाही ; नेते गुंतले जिल्हा बँकांच्या निवडणुकीतच

कपाशीच्या उत्पादनावर परिणाम

आधीच पीक नुकसानीने आर्थिक गणित बिघडलेल्या शेतकऱ्यांना आता सिंचनासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास तूर आणि कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करतानाच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण करून शासनाने परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बाळापूर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com