

Pune Teacher Graduate Election
esakal
कोल्हापूर : उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली, तरी शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या पक्षीय पातळीवरील हालचाली अजूनही थंडच आहेत. इच्छुकांनी मेळावे, संपर्क दौऱ्यातून वातावरण निर्मिती सुरू केली असताना आतापर्यंत या दोन्हीही निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित आहे. पण, महायुतीत पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीतच मोठी रस्सीखेच आहे. उद्यापासून सलग तीन दिवस सुटी असल्याने या जागा वाटपाची घोषणा सोमवारीच होण्याची शक्यता आहे.
पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होत आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे व सोलापूर अशा पाच जिल्ह्यांत मतदान होईल. या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ६ ऑक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. पण, तीन दिवसांत या दोन्ही निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
सांगली व सातारा जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सद्या सुरू आहे. या दोन्हीही तालुक्यांतील महाविकास आणि महायुतीचे नेते या निवडणुकीत गुंतले आहेत. कोल्हापुरात ‘गोकुळ’सह जिल्हा बँकेच्याही निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्हीकडील नेते या निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे जागा वाटपापासून ते उमेदवार निश्चितीची प्रक्रिया जवळपास थंड आहे; पण उमेदवारी निश्चित असलेल्या आणि सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या उमेदवारांकडून मात्र संपर्क दौरे, मेळावे, गाठीभेटी या माध्यमातून प्रचार सुरू आहे.
महायुतीत पदवीधरसाठी शिवसेना शिंदे पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्षांत चढाओढ आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेना व भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले; पण उमेदवारांची घोषणा झालेली नाही. आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीनच दिवस उरले आहेत, तोपर्यंत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.