Ajra Elephant AI Monitoring : हत्तींच्या हालचालींवर आता ‘एआय’चे लक्ष आजऱ्यात कार्यशाळा ; उपद्रव टाळणे शक्य, संगोपन केंद्राच्या जागेची पाहणी

AI Cameras and Drones to Track Wild Elephants : हत्ती गावाजवळ आल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने पोहोचून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
Ajra Elephant AI Monitoring

Ajra Elephant AI Monitoring

esakal

Updated on: 

आजरा : हत्तींच्या हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी एआयचा वापर करण्यासाठीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हत्ती गावाजवळ आल्यास त्याची माहिती ग्रामसंस्कार वाहिनी तसेच वनविभागाच्या नियंत्रण कक्षास मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे वनविभागाचे पथक हत्ती आलेल्या ठिकाणी तातडीने पोहोचेल. त्याला सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने पाठवून देईल. यामुळे हत्तींचा उपद्रव टाळता येऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे शक्य असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त सुलगाव (ता. आजरा) येथील आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयात ‘वन्यजीव निरीक्षण प्रणाली व व्यवस्थापन,’ या विषयावर कार्यशाळा झाली. कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. सहायक वनसंरक्षक विलास काळे, आजरा परिक्षेत्राचे वनअधिकारी सचिन सावंत प्रमुख उपस्थित होते. घाटकरवाडी (ता. आजरा) येथे होणाऱ्या प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्राच्या जागेची पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

Ajra Elephant AI Monitoring
Kolhapur Moneylending Crisis : सावकारीच्या कथित जाचातून दोन जणांचा मृत्यू; कोल्हापूर जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात कठोर कारवाईची मागणी

एआय तज्ज्ञ सौरभ मोईत्रा यांनी एआय प्रणालीची माहिती दिली. एआयमुळे वन्यजीवांची हालचाल लगेच समजते. याबाबत वेळेवर माहिती मिळाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होत असल्याचे सांगितले.

त्यांनी वनकर्मचारी व हत्ती हाकारा पथकाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अडचणी व अनुभव जाणून घेतले. वनपाल कृष्णा डेळेकर, संदीप शिंदे, श्रीमती कविता सावंत, वनरक्षक संगीता राठोड, प्रियांका पाटील, श्रीमती सरिता बावस्कर, लेखापाल संग्राम खापरे, वनपरिक्षेत्र आजरा येथील अधिकारी, कर्मचारी, जलदकृती दल व हत्ती हाकारा गटाचे सदस्य उपस्थित होते.

Ajra Elephant AI Monitoring
MPSC विद्यार्थ्यांचा संताप कायम; पुण्यात रात्रीपासून आंदोलन, नेमकी मागणी काय? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही विद्यार्थी रस्त्यावर

एआय आधारित कॅमेरे, ड्रोन प्रणाली

घाटकरवाडी (ता. आजरा) येथे प्रस्तावित हत्ती संगोपन केंद्र व परिसरात एआय आधारित कॅमेरे आणि एआय ड्रोन प्रणाली वापरण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे जंगली हत्तीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com