अकाेला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही महिला उघड्यावर

ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त गाव अभियानाची ऐशीतैशी
Barshitakali village public toilets
Barshitakali village public toilets

बार्शीटाकळी : सार्वजनिक शौचालचे असूनही ते नागरिकांच्या उपयोगाचे नसल्याने पुरुषांसह महिलांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत असल्याचे वास्तव बार्शीटाकळी शहरात पाहवयास मिळते.

२५ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या बार्शीटाकळी शहराची अवस्था स्वच्छेते अभावी एखाद्या उकीरड्या प्रमाणे दिसून येते आहे. नालीचे सांड पाणी, रसत्यावर बांधलेले जनावरे, रस्त्यावर पडलेला मल, मुत्राचा सडा, शहरात मोठ्या प्रमाणात गस्त लावणारे व लहान बालकांचे लचके तोडणारे पिसाळलेले श्वान व रस्त्यांच्या कडेलाच टाकलेल्या शेण खंताचे ढिगारे व त्यातून निघणाऱ्या उगरट दुर्गंधी, शौचालया शेजारीच वाढलेले गाजर गवत, अशा अनेक अस्वच्छतेच्या बाबींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. शहरातील स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी व उपोषण सुद्धा करण्यात आले.

नगरपंचायत याकडे लक्ष देण्यात तयार नाही. शहरातील इंदिरा आवास परिसरातील वार्ड नंबर १७ मध्ये शासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र सार्वजनिक शौचालयाचा लोकार्पण सोहळा अद्यापही झाला नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून शौचालयाला टाळेच पाहायला मिळते. महिला लोकप्रतिनिधी असूनही प्रभाग क्रं १७ मधील बहुतांश महिलांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे.

सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीकरिता काढण्यात आलेले देयक माझ्या कार्यकाळातील नाही. मागील तीन वर्षांपासून शौचालयाला असलेल्याला कुलूप विषय बांधकाम अधिकारी यांचा आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यावरच शौचालयाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

- योगेश तायडे, स्वच्छता अधिकारी, न.पं. बार्शीटाकळी.

सार्वजनिक शौचालयाचे कुलूप न.पं. ने उघडले नसल्याने शौचालयाच्या गेट समोरच शेजारील व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. उघड्यावर शौचास जाण्यास महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळो-वेळी तक्रारी देऊनही स्वच्छता अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत.

- जवेरीया शहजादी, त्रस्त महिला.

शौचालयाचे बांधकाम झाले त्यावेळी त्यामधील तुटलेल्या शिट, टाईल्स व इतर डागडुजी मी केली आहे. सर्व कामाचे देयक सुद्धा मिळाले आहे. सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण करून ते नागरिकांच्या सेवेत चालू करायला पाहिजे.

- नियाजोद्दीन काजी, कंत्राटदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com