Akola News : उपराष्ट्रपतींची नकल करणाऱ्यांचा भाजपकडून निषेध

नक्कल संसद परिषदांमध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली व त्याचे चित्रिकरण राहुल गांधी यांनी केले.
bjp protest in akola vice president dhankhad jat community health issue insulted rahul gandhi took video politics
bjp protest in akola vice president dhankhad jat community health issue insulted rahul gandhi took video politicsSakal

Akola News : भूमिपुत्राचा अपमान सहन केला जाणार नाही. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून निवडून गेलेले संविधान पदावर बसलेल्या व्यक्तींचा अपमान करणे म्हणजे देशाचा अपमान करणे होय.

वसंसदेला शमशान भूमी म्हणणे म्हणजे वैचारीक दिवाळ खोरीचा प्रकार आहे. त्या समशान भूमीमध्ये आपण का प्रतिनिधित्व करता, असा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.उपराष्ट्रपतींची नकल करून त्यांचा अवमान केल्या प्रकरणी भाजपतर्फे आयोजित निषेध आंदोलन प्रसंगी ते बोलत होते.

तृणमुल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना उद्देशून आमदार सावरकर यांनी उपरोक्त प्रश्न उपस्थित केला.

जाट नेते व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पाठीचा आजार असल्यामुळे ते वाकून चालतात. त्यांची नक्कल संसद परिषदांमध्ये टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली व त्याचे चित्रिकरण राहुल गांधी यांनी केले. त्याचा निषेध अकोला भाजपतर्फे गुरुवारी खुले नाट्यगृह परिसरातील करण्यात आला. जिल्ह्यात पंधरा ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, किशोर मागंटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, रमेश लोहकरे, डॉ. मनीष जैन, अशोक अंबुस्कर, राजेश बेले, माजी आमदार बळीराम सिरस्कार, कृष्णा शर्मा,

वसंत बाछूका, माधव मानकर, संजय गोटफोडे, देवाशीष काकड, गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, विजय मालोकार, पवन पाडिया, पवन महल्ले, वैकुंठ ढोरे, विनोद मापारी, हरिभाऊ काळे, शारदा ढोरे, गीतांजलीताई शेगोकार, अनुराधा नावकार आदींसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com