Prakash Ambedkar
sakal
अकोला - राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार पाण्याने वाहून गेले आहेत. तरीसुद्धा सरकारकडून खावटीसह कोणतीही तातडीची मदत मिळालेली नाही. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले, पण सरकार मदत देण्याचे आश्वासन दिवाळीसाठी पुढे ढकलत आहे. मदत केव्हा मिळेल याची काहीच खात्री नाही.