बुलडाणा : त्या दिवशीच शिवसेनेचे हिंदुत्व फिके पडले; विनोद वाघ

अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी शिवसेनेवर करीत टोला लगावला
bjp state spokesperson Vinod Wagh Shiv SenaHindutva faded Buldana
bjp state spokesperson Vinod Wagh Shiv SenaHindutva faded Buldanasakal

सिंदखेड राजा : भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वावर कोणीच शंका घेऊ शकत नाही. जनसंघ पक्षापासून आज पर्यंत भाजपा ची हिंदूत्व विचार सरणी कायम आहे व पुढे ही राहील. व त्या सोबतच सबका साथ सबका विकास हे धोरण घेऊन आम्ही काम करत असलो तरी आम्ही हिंदुत्व कधीच सोडले नाही. मात्र, ज्या दिवशी शिवसेनेने भाजपची साथ सोडली त्याच दिवशी शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी शिवसेनेवर करीत टोला लगावला आहे.

विनोद वाघ म्हणाले, की भाजप हा हिंदुत्व विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, हे सांगायला आम्हाला कोणाचीही गरज नाही आणि संकोचही नाही. त्यांच्या आणि आमच्या हिंदुत्वात फरक आहे.सत्तेसाठी त्यांना हिन्दूत्वाचा विसर पडला आहे.ज्या दिवशी या राज्यातील जनतेने शिवसेना व भाजपला सरकार बनवण्याचा जनादेश दिला होता, त्याच दिवशी त्यांनी आमच्याशी दगाफटका करून राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती केली.भगव्याची साथ सोडून हिरव्याची साथ धरली. त्याच दिवशी त्यांचे हिंदुत्व फिके पडले. भविष्यात हे तीन- चार पक्ष कोण कोणासोबत जाईल हे सांगता येत नाही.मात्र सर्व जण एकत्र येऊन भाजपचा पराभव करू शकतो, अशी यांची कल्पना होती. मात्र ती कल्पना गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश यासह चार राज्यांतील मतदारांनी धुळीस मिळवली.

महाराष्ट्रा मध्ये ही त्यांच्या पदरी निराशा येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या नादाला लागून शिवसेना दिशाहीन झाली त्याना कोणतीही दिशा राहिलेली नाही. तसेच त्यांना तत्व व धोरण काहीच राहिले नाही.एम आय एम ला ते भाजपची बी टिम म्हणतात मग उत्तर प्रदेश,पश्चिम बंगाल, गोवा या ठिकाणी उमेदवार उभे करुन भाजपचे मत खाण्याचा प्रयंत्न करणारी शिवसेना सपा, तृनमुल कॉंग्रेस व कॉग्रेस ची बि टिम आहे का ? अशी टीका विनोद वाघ यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com