esakal | कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली

कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविड मुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्याांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहते. यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहरे काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ती साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतीय जैन सघंटनेने (बीजेएस) राज्यातील अशा ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. (BJS accepted responsibility for 700 orphans due to corona)

हेही वाचा: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू


बीजेएसने लातूर भुकंपातील १२०० भकूंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षांत एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहरे काढून त्यांचे शैक्षणिक पुर्नवसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संंवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहरे काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने पुण्यातील मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने, संशोधनावर आधारीत उपचार करून त्याचे अहवाल बनविण्यात आले आहेत.

हेही वाचा: युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

देशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, याची खात्री आहे. भारतीय जैन सघंटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या व पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेतील. त्यांच्या घरी जावून त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील.

हेही वाचा: महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’

पुण्यातील शाळेत देणार प्रवेश
बीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शिक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्याांसाठी वसतीगृह, नास्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.

संपादन - विवेक मेतकर

BJS accepted responsibility for 700 orphans due to corona

loading image