esakal | एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो

बोलून बातमी शोधा

एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो
एक कोटी देतो रेमडीसिव्हर द्या, मी फुकट वाटतो
sakal_logo
By
विवेक मेतकर

बुलडाणा : राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्यू दरात वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शन साठी वणवण फिरत असताना त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मात्र एजंटांकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत.

हा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो. रुग्णांचे जीव तरी वाचतील, अशी संतप्त प्रतिक्रिया देत बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हेही वाचा: राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावे मागितला १० लाखांचा हप्ता!

उल्लेखनीय म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्हा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन आहे.

हेही वाचा: दोन खासदार, सहा आमदार तरीही जनता बेजार!

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोविड रुग्णांचा आकडा आज ८ हजारावर गेलेला आहे, तर आता पर्यंत ३९० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाने अपंग विद्यालय ताब्यात घेऊन तेथे कोविड रुग्नालय तयार केले आहे. याठिकाणी सध्या जिल्ह्यातील गंभीर असलेल्या रुग्नांवर ऑक्सिजन सह उपचार दिले जातात.

हेही वाचा: आधी कोरोना चाचणी, मगच पुढील प्रवास

मात्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन असलेल्या या जिल्ह्यातील हे कोविड सेंटर सध्या शेवटच्या घटक मोजत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याने येथील कार्यरत आरोग्य कर्मचारीही राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.