दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

Boiler Starts Suddenly During Repair: बॉयलर दुरुस्तीच्या कामात तरुण कामगाराचा मृत्यू झाला आहे. दोनद येथील वैशाली बायोफ्युएल कंपनीतील घटना असून सुरक्षा साधनांअभावी दुर्घटना झाल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.
Boiler Accident

Boiler Starts Suddenly During Repair

Esakal

Updated on: 

योगेश फरपट, अकोला : दोनद (ता. बार्शीटाकळी) येथील वैशाली बायोफ्युएल कंपनीत बॉयलरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण काळे (वय २३, रा. बारामती, जि. पुणे) असे मृत कामगाराचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. इथेनॉल निर्मिती करणाऱ्या या कंपनीत ही दुर्घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात दुरुस्तीचे काम करताना कामगाराकडे आवश्यक सुरक्षा साधने नसल्याचे दिसून येत असल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com