विहिरीचे खोदकाम सुरू असताना अंगावर वीज पडून दोघांचा मृत्‍यू

Both died due to lightning in buldhana district
Both died due to lightning in buldhana districtBoth died due to lightning in buldhana district

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : काही दिवसांपूर्वी वीज पडून (lightening) तीन शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली होती. ही घटना ताजी असताना गुरुवारी (ता. २३) अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्‍यू झाला. तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना संग्रामपूर तालुक्‍यातील पळशी झांशी येथे घडली. (Both died due to lightning in buldhana district)

प्राप्त माहितीनुसार, पळशी झांशी गावालगत असलेल्या शेतात गुरुवारी विहिरीचे खोदकाम सुरू होते. या ठिकाणी काम करीत असलेले संजय उत्तमराव मारोडे (५०), रवी भालतडक (३५) व अन्य सहकारी काम करीत होते. दुपारी अचानक विजांचा कडकडाट (lightening) सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली.

Both died due to lightning in buldhana district
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेतला तर...

मोठ्याने विजेचा आवाज होऊन पळशीच्या शेतात विहिरीवर वीज पडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती तातडीने तहसीलदार संग्रामपूर यांना देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com