esakal | दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स
sakal

बोलून बातमी शोधा

 दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स

दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा ः मार्च २०२० पासून कोविड १९ मुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यावर उपाय म्हणून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद त्याचे नियोजन करीत आहे. (Bridge course for students from 2nd to 8th)


मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद आहेत. वर्ग खोलीत प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाचे कार्य झाले नाही. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात तिसऱ्या कोरोना लाटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शाळा केव्हा सुरू होतील या बाबत संभ्रमावस्था आहे. तोपर्यंत शाळेला ब्रीज कोर्स शिकवावा लागणार आहे. विषय शिक्षकांचा गट तयार केला जाईल. सर्व स्थितीचा विचार करून अभ्यासक्रम निश्चित केला जाईन. यामध्ये विद्यार्थी दुसरीत असेल तर पहिलीच्या अभ्यासक्रमाचा आधार घेतला जाईन. म्हणजे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सातवीचा अभ्यासक्रम आधारभूत असेल.

हेही वाचा: नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर सिल

मागील वर्षीचा जो अभ्यासक्रम समजला नाही तो शिकवला जाईल. त्याशिवाय नवीन अभ्यास सुरू केला जाणार नाही. विज्ञान व गणित या विषयावर अधिक भर असेल. हा कोर्स ४५ दिवसांचा असेल. सन २०२० व २०२१ मध्ये परीक्षा न घेता पुढील वर्गात विद्यार्थी गेले. ऑनलाइन शिक्षणाचा पाहिजे तसा प्रभाव पडला नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणे हा या कोर्सचा उद्देश आहे.

हेही वाचा: विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लसमागील वर्षीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. काहींना ऑनलाइन समजले नाही. अशा परिस्थितीत नवीन अभ्याक्रमानुसार शिकवले तर समजणार नाही. ब्रीज कोर्समुळे ही पोकळी भरून काढता येईल.
- दीपक दही, केंद्र प्रमुख , बेलखेड.

संपादन - विवेक मेतकर
Bridge course for students from 2nd to 8th

loading image