esakal | तपास धमकीचा अन् गुन्हा उघड झाला खुनाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तपास धमकीचा अन् गुन्हा उघड झाला खुनाचा; मेसेजने आला संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मुलीचे अश्लील फोटो काढून व्हायलर करण्याची धमकी देण्याची तक्रार पातूर पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास करीत आरोपीला अटक केरण्यात आली. त्याच्या मोबाईलमधील संदेशावरून पातूर पोलिसांच्या डीबी पथकाने तब्बल दोन वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

पातूर तालुक्यातील दिग्रस खु. येथील महिलेने तिच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पातूर पोलिस स्टेशनला दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांनी डीबी पथकाच्या प्रमुख मिरा सोनुने यांना अरोपी पकडण्याबाबत मार्गदर्शन केले. अवघ्या काही तासांतच योगेश विलास इळोळे (२३, रा. इनामदार पुरा, वाशीम) यास पुसद नाका वाशीम येथील बालाजी हॉटेलमधून ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील आरोपीस गुन्ह्यासंबंधाने पोलिस उपअधीक्षक संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना आरोपीच्या मोबाईल फोनची पाहणी करताना मॅसेजवरून संशय आला. त्यावरून सखोल चौकशी केली असता योगेशने दोन वर्षांपूर्वी केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी योगेशने त्याच्या प्रेमीकेशी संबंध ठेवल्याच्या संशयावरून सख्खा भाऊ गजानन इळोळे यास बोलावून दारू पाजली व स्प्रिंकलचे लोखंडी पाइप डोक्यात मारून खून केला. मृतदेह शेताच्या बाजूला खड्डा खोदून पुरला होता.

हेही वाचा: शारीरिक संबंधास नकार; पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीचा खून

तब्बल दोन वर्षांपर्यंत या घटनेची कोणासही साधी भनकसुध्दा लागू दिली नाही. त्याचा भाऊ नागपूर येथे कामाला असल्याचे आईस खोटे सांगत राहिला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीधर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या हद्दीतील पौड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली व गुन्हा दाखल करून प्रवीण ऊर्फ ओम आसरू मुटकुळे यास ताब्यात घेतले.

loading image
go to top