प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप

प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप

मुशीरखान कोटकर

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) ः पक्की घरे नसलेल्या शहरातील गरजू व्यक्तींचे स्वप्न साकारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील नुकतेच प्रकाशीत लाभधारकांच्या यादीत धनदांडग्यांनी आपले प्रस्थ जमविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे योजनेच्या निकषाला डावलून मर्जीतील लोकांचा सदर यादीत समावेश झाल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे दरम्यान सर्वे करणारी एजन्सी, काही नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सांघिक व्ह्युरचनेच्या कचाट्यात असंख्य दुर्बल घटक पक्क्या घरापासून वंचित राहिल्याने सदर गैरप्रकाराची चौकशी करून धनदांडग्यांच्या समावेश असलेली यादी रद्द करण्याची मागणी होत आहे याबरोबरच सदर कटकारस्थानात सहभागी अधिकारी व नगरसेवकांवर कारवाईची मागणी होत आहे. (Buldana Deulgaon Raja Pradhan Mantri Awas Yojana Gharkul scam)

येथील नगरपालिकेच्या माध्यमाने शहरातील ज्या कुटुंबाकडे पक्की बांधलेली घरे नाहीत अशा गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रत्येकी २ लाख ६० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी योजनेच्या निकषाला आधिन राहून सन २०१८-१९ अर्ज मागविण्यात आले होते डीपीआर प्लॅन नुसार सदर योजनेच्या २७१ लाभार्थींची यादी नुकतीच मंजूर करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप
अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?

सदर यादीमध्ये नगरसेवकांच्या घरातील नातेवाईक,पती,मुलगा,वडीलांचा समावेश आहे,तसेच एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश सदर यादीत असून शासकीय नोकरदारांचा ही प्रधानमंत्री आवास योजनेत लाभधारक म्हणून समावेश करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर ज्यांची शहरात दुमजली पक्की इमारत बांधलेली आहे ज्यांच्या कडे दोन ते तीन कुटुंब भाडेकरू म्हणून राहतात अशी नावे सदर यादीत आहे स्वतः पालिकेत नोकरी करणारे व्यक्ती तसेच शहरातील राजकीय क्षेत्रातील मातब्बर महाभागांचा सदर यादीत समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप
भातुकलीचा खेळायच्या वयात संसार थाटला, अत्याचार केल्याने पतीसह चौघांना अटक

ज्यांची पक्की घरे बांधलेली आहेत अशा अनेकांना या यादीत स्थान मिळाले असून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अटी शर्ती व निकष डावलण्यात आले आहे सदर योजने साठी वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या कमी पाहिजे असताना सर्वे करणारी एजन्सी,नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा गौडबंगाल रचण्यात आला आहे.

e sakal

परिणामी शहरातील असंख्य दुर्बल घटकातील कुटुंब प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित राहिले आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्देशाला सदर गैरप्रकारा मूळे खिळ बसली आहे कागदोपत्री जुळवाजुळव करून पात्र नसलेल्या व्यक्तीच्या नावाने घरकुल मंजूर करण्यात आले असून अपात्र असलेल्या धनदांडग्या कुटुंबातील सदस्यांचा यादीत समावेश करून शासनाला लाखो रुपयांची फसवणूक करू पाहणाऱ्या संबंधित महाभागांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे

प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप
मेहकर येथे खोदकामात सापडलेल्या मंदिराचे अवशेष बाराव्या शतकातील

घडलेला प्रकार गंभीर असून पालिकेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे डी पी आर नुसार सॅंक्शन यादीत लखपती लोकांचा समावेश करण्यात आला आहे पालिका प्रशासन व काही नगरसेवकांनी आपल्या मर्जीतील लोकांना पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून सदर योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे हा मोठा भ्रष्टाचार असून यासंदर्भात शिवसंग्राम संघटने कडून तक्रार दाखल केली आहे सदर गैरप्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करून स्पॉट पंचनामा करण्यात यावा व खऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ द्यावा

- राजेश इंगळे तालुकाध्यक्ष शिवसंग्राम संघटना

घरकुलाचा लाभ देण्यासाठी एका एजन्सी ची नेमणूक करण्यात आली होती यादीत नावे असलेल्या सर्व लाभधारकां कडून शपथपत्र लिहून घेतलेले आहे ज्यांची पक्की घरे बांधलेली निदर्शनास येतील त्यांची नावे वगळून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत पालिकेचे मुख्यअधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे

-सुनिता रामदास शिंदे नगराध्यक्ष देऊळगाव राजा

संपादन - विवेक मेतकर

Buldana Deulgaon Raja Pradhan Mantri Awas Yojana Gharkul scam

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com