
दोन वर्षांचे मादी बिबट वाशीम जिल्ह्यातील परिसरात माकडांचा पाठलाग करित होते. मात्र, पाठलाग करीत असताना शेतातील विहिरीजवळ एक विचित्र प्रकार समोर आला.
बुलडाणा: दोन वर्षांचे मादी बिबट वाशीम जिल्ह्यातील परिसरात माकडांचा पाठलाग करित होते. मात्र, पाठलाग करीत असताना शेतातील विहिरीजवळ एक विचित्र प्रकार समोर आला.
31 डिसेंबर रोजी सकाळी दोन वर्षीय मादी बिबट माकडाचा पाठलाग करत होते. बुलडाणा तालुक्यातील जनुना शिवारात पंडित यशवंता नरोटे यांच्या गट नंबर ११८ मधील ४० फूट खोल विहिरीत पडले. त्यामध्ये बिबटचा मृत्यू झाला.
यासंदर्भात जनुना वन समिती अध्यक्ष रामकिशन राजपूत यांनी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी बुलडाणा वन विभागाला माहिती दिली
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
दरम्यान, एसीएफ रंजीत गायकवाड, बुलडाणा आरएफओ गणेश टेकाळे, वनपाल सुधीर आंबेकर, वनरक्षक समाधान मांटे, कैलास कराड, पोलिस पाटील प्रमोद ढोमने हे घटनास्थळी पोहोचले.
(संपादन - विवेक मेतकर)