बुलडाणा : नगराध्यक्षांनी जमविली बेहिशोबी मालमत्ता; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढील तपास लाचलुचपत विभाग बुलडाणा यांच्या वतीने करण्यात येणार .
बुलडाणा : नगराध्यक्षांनी जमविली बेहिशोबी मालमत्ता; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बुलडाणा : नगराध्यक्षांनी जमविली बेहिशोबी मालमत्ता; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलsakal

बुलडाणा : बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी जिल्ह्यात पहिल्यांदाच मेहकर नगराध्यक्षांची चौकशी करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात इतर राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली आहे. मेहकर नगरपालिका नगराध्यक्ष पदावर लोकसेवक म्हणून कार्यरत असताना कासम पीरु गवळी यांनी बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी बुलडाणा लाचलुचपत विभागाने चौकशीअंती कासम गवळी व त्यांच्या पत्नी हसीना बी कासम गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा लाचलुचपत विभागाने २१ डिसेंबर २००६ ते २२ सप्टेंबर २०२० असे १४ वर्षांचे परीक्षण करत मालमत्तेबाबत येणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत तपासून चौकशी केली. यात लोकसेवक कासम पीरु गवळी नगराध्यक्ष मेहकर पदावर असून, परीक्षण कालावधीदरम्यान, नगरपालिका मेहकर येथे लोकसेवक पदावर कार्यरत असताना, त्यांच्या माहिती व कायदेशीर उत्पन्नापेक्षा विसंगत अशी नमूद रक्कमेची अपसंपदा स्वत:च्या तसेच पत्नीच्या नावे बाळगली. चौकशीदरम्यान ते समाधानकारक खुलासा सादर करू शकले नाही.

बुलडाणा : नगराध्यक्षांनी जमविली बेहिशोबी मालमत्ता; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Good news: MPSC परीक्षेला बसण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

रक्कम कोट्यवधीत

लोकसेवक कासम गवळी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना, त्यांची अपसंपदा रक्कम ५ कोटी ९ लाख ८८ हजार ४९५ रुपये एवढी लाचलुचपत विभागाने दाखविली. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांनी तक्रार दिली असून, पुढील तपास लाचलुचपत विभाग बुलडाणा यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com