esakal | चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन; हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

army

चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन; हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली (जि. बुलडाणा) : लुधियाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे यांना ९ सप्टेंबरला रात्री हजारो लोकांच्या उपस्थितीत अखरेचा निरोप देण्यात आला. ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेच्या सुमारास अकस्मातपणे चक्कर येऊन ते खाली कोसळले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

लष्करी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शहीद श्याम शिंदे यांचे पार्थिव ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चिखली येथे आणण्यात आले. चिखली येथे त्यांचे पार्थिव आल्यानंतर जुनेगाव मित्रमंडळाच्यावतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, बैल जोडी, चिंच परिसर, जुने गाव, देशमुख गल्ली येथून त्यांच्या निवासस्थानापर्यंत अंत्ययात्रा काढून त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले.

हेही वाचा: अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

याठिकाणी शहीद शिंदे यांच्या पत्नी स्वाती श्याम शिंदे, आई कावेरीबाई आणि अवघ्या ११ वर्षांचा अनिरुद्ध व ६ वर्षांचा देवांश या दोन मुलांनी टाहो फोडताच उपस्थित कुटुंबीय, आप्त-स्वकीय आणि मित्रपरिवाराचा शोक अनावर झाला. त्यानंतर जुनेगाव स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. याठिकाणी माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया व कुणाल बोंद्रे, उपाध्यक्षा वजीराबी व शे.अनिस, प.सं.सभापती सिंधू तायडे, आमदार श्वेता महाले यांच्यावतीने अंकुशराव पडघान, प्रा.नरेंद्र खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, रामदास देव्हडे, नगरसेवक पंडितराव देशमुख, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, नामु गुरूदासाणी, संजय अतार, सुदर्शन भालेराव आदी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, ठाणेदार अशोक लांडे, मुख्याधिकारी सुरडकर आदींनी पुष्पचक्र वाहून शहीद श्याम शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान पोलिस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद शिंदे यांचे मोठे बंधू अनंथा शिंदे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

loading image
go to top