esakal | Buldhana: ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

बुलडाणा : ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेड राजासह अजिंठा, वेरूळ, दौलताबाद येथील ऐतिहासिक व पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने विकास कामासंदर्भात तारीख ७ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयांमध्ये बैठक संपन्न होणार आहे.

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक स्थळाबद्दल फोटोग्राफ्स दाखवून त्यासंदर्भात सविस्तर पणे माहिती दिली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्वतः सिंदखेड राजाला येवुन ऐतिहासिक स्थळांची पहाणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी तारीख २५ सप्टेंबर रोजी मातृतिर्थ सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक मोती तलाव, रामेश्वर मंदिर, राजे लखोजीराव जाधव समाधी, निळकंठेश्वर मंदिर , रंगमहाल, काळा कोट, सावकार वाडा ,राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, पुतळा बारव, चांदणी तलाव यांना भेटी देऊन सविस्तरपणे माहिती जाणून घेतली.

हेही वाचा: वाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला

त्यानंतर ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले होते तसेच आपण ऐतिहासिक वास्तूच्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटून लवकरच बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले होते.त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र लिहून सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक स्थळांचा पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने परिसराचे सुशोभिकरण करणे, परिसर विकास करणे व विकास आराखड्यासंदर्भात, केंद्र व राज्याच्या विविध खात्यात मधला समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महत्वाचा असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रात मनुत केले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,सुभाष देसाई पालकमंत्री औरंगाबाद, डॉ. राजेंद्र शिंगणे पालकमंत्री बुलढाणा ,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव नियोजन, अपर मुख्य सचिव वित्त, अपर मुख्य सचिव ग्रामविकास, सचिव बांधकाम विभाग, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी, नगर परिषद अध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहे.

loading image
go to top