Buldhana Loksabha Result : बुलढाणा लोकसभेत विजय मिळूनही महायुतीच्या आमदारांचं का वाढलंय टेन्शन?

लोकसभा निवडणुकीत खामगाव व जळगाव जामोद वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना मिळालेली पिछाडी हा त्या-त्या मतदारसंघातील आमदारांसमोर चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे.
mla in buldhana
mla in buldhanasakal

बुलडाणा - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खामगाव व जळगाव जामोद वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना मिळालेली पिछाडी हा त्या-त्या मतदारसंघातील आमदारांसमोर चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे हे चारही आमदार सत्तेतील आहेत. यापैकी दोन शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व डॉ. संजय रायमुलकर, एक राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे व एक भाजपच्या श्वेता महाले आहेत.

तसे पाहिले तर लोकसभा निवडणुकीला विधानसभेची रंगीत तालीम संबोधले जाते. बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत खामगाव व जळगाव जामोद या मतदार संघांनी खासदार प्रतापराव जाधव यांना प्रत्येकी २० हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य दिले. मात्र हा ट्रेंड बुलडाणा, चिखली, मेहकर व सिंदखेडराजा या मतदारसंघांना पाळता आला नाही. याला जबाबदार कोण? हा प्रश्नही आता समोर येईलच.

बुलडाणा मतदारसंघात २२५५ मतांची पिछाडी, चिखलीमध्ये ११ हजार ९२०, सिंदखेड राजामध्ये ८४९८ व मेहकरमध्ये अर्थात खासदारांच्या होम ग्राउंडवर स्वतः आमदार शिंदे गटाचे असताना नगण्य ३६३ मतांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना देखील आघाडीच्या दोन उमेदवारांइतकीच मते मिळाली आहेत.

खामगाव आणि जळगाव जामोद मतदारसंघांनी भरघोस मतदानाच्या रुपाने साथ दिल्यानेच हा विजय निश्चित झाला. एवढे नक्की ! मात्र इतर चारही आमदार सन्मानजनक आघाडी तर सोडाच परंतु पिछाडीवर का राहिले ? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

आगामी सहाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत व विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशावेळी लोकसभेमध्ये मिळालेली गोळाबेरीज निश्चितच विचारात घेतली जाणार आहे. शिवाय महाराष्ट्रात महायुतीला बसलेला मोठा फटका व महाविकास आघाडीने घेतलेली आघाडी हा देखील फॅक्टर महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात हे सत्ताधारी आमदार कोणती खेळी खेळून आपली राजकीय घडी नीट बसवितात, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com