Buldhana: शाळा सुरू, पण शाळेत नेणारी एसटी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

शाळा सुरू, पण शाळेत नेणारी एसटी बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा : दिवाळीनंतरच्या दुसऱ्या सत्रातील शाळांना सोमवारपासून सुरुवात झाली आहे. परंतु, मागील २३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने लाल परीची चाके रुतलेली आहेत. त्यामुळे दिवाळीतही अनेक प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. शाळा सुरू झाल्या असल्या तरी एसटी बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचाच परिणाम शाळेच्या उपस्थितीवर झाला आहे.

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. परंतु,अद्यापही शासनाकडून या संपावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाचा फटका २२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना बसत आहे. ग्रामीण भागात एसटी बसेस बंद असल्याने विद्यालयापर्यंत पोहोचण्यास अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तर काही विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेपर्यंत पोहोचले. मानव विकास बसेसच्या माध्यमातून अनेक मुली या विद्यालयात येत असतात. परंतु, एसटी बस बंद असल्याने त्यांची अडचण झाली आहे. एकंदरीत या बंदचा फटका शाळांना बसला आहे.

हेही वाचा: Farm Bills: 'तो अहवाल सार्वजनिक करा'; अनिल घनवट यांची सुप्रीम कोर्टाकडे मागणी

सेवा समाप्‍तीची कारवाई

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांबरोबर आता रोजंदारी कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटीस देऊनही ते सेवेत रुजू न झाल्याने कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तर काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनदरबारी विचार व्हावा. त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. परंतु सध्या बस सेवा बंद असल्याने व शाळा सुरु झाल्याने विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. कारण बस सेवा बंद असल्याने विद्यार्थिनी विद्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत.

- मोहन कावळे, मुख्याध्यापिक

loading image
go to top