Buldhana : केस, नख गळती झाली, आता हाताला पडतायत भेगा; बुलढाण्यात खळबळ, आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांची तपासणी

Buldhana News : बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख गावात २० पेक्षा जास्त जणांच्या हाताला भेगा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने गावकऱ्यांची तपासणी केली.
Buldhana News
unidentified skin disease in Buldhana MaharashtraEsakal
Updated on

SHOCKING SKIN CONDITION IN BULDHANA: बुलढाणा जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी केसगळतीच्या समस्येनं खळबळ उडाली होती. त्यानंतर नख गळतीचा प्रकारही समोर आला होता. तर आता चक्क हाताला भेगा पडण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मेहकर तालुक्यातल्या शेलगाव देशमुख गावात हा प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com