बुलढाणा : भरधाव टिप्परची क्रुझरला धडक; एक जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलढाणा : भरधाव टिप्परची क्रुझरला धडक; एक जागीच ठार

बुलढाणा : भरधाव टिप्परची क्रुझरला धडक; एक जागीच ठार

नांदुरा (जि. बुलढाणा) : गिट्टीच्या टिप्परने क्रूझरला जबर धडक दिल्याने १ जण जागीच ठार तर १३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना श्री संत गजानन महाराज मंदिर नवी येरळी जवळ (ता. २५)रोजी दुपारदरम्यान घडली. यामध्ये नांदुर कडून जळगाव जामोदकडे जाणारे गिट्टीचे विना क्रमांकाचे नवीन टिप्पर व जळगाव जामोद कडून नांदुरा कडे जाणारी क्रुझर क्रमांक एम एच २८ सी ४१३८ यांच्यामध्ये नवी येरळी जवळ जबरदस्त धडक होऊन त्यामध्ये तुळशीराम मोतीराम सुरळकर वय ६५ वर्ष रा. पलसोडा सह सर्व जखमीना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण जयस्वाल, डॉ.चेतन बेंडे, डॉ.फिरदोस यासमीन यांनी त्यांना मृत घोषित केले.

जखमींमध्ये रुख्माबाई नागोराव सुरळकर वय ४५ , समाधान शंकर सुरळकर वय ५०, ओंकार पंढरी सुरळकर वय ६५, नागोराव ओंकार सुरळकर वय ६५, बारसु ओंकार सुरळकर वय ४५, तुकाराम सदानंद चांभारे वय ३० क्रुझर गाडीचा चालक, अंजनाबाई ओंकार सुरळकर वय ७५, निर्मला किसन सुरळकर वय ६०, गजानन प्रल्हाद सुरळकर ४५ ,दौलत नारायण सुरळकर वय ४५, सुभाष शंकर सुरळकर वय ६५, वैष्णवी बारसु सुरळकर वय १०, मिराबाई नागोराव सुरळकर वय ३५ जखमी झाले आहेत.

हेही वाचा: परमबीर सिंग महाराष्ट्रात दाखल; सरकार करणार कारवाई

अपघाताची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे, विलास निंबोळकर, वीण डवंगे, पवन चरखे, क्रिष्णा नालट, अजय सपकाळ यांच्यासह सर्वांच्या सहकार्याने अपघातातील जखमींना उपचारार्थ प्रथम नांदुरा, खामगाव, अकोला येथे हलविण्यात आले. सदर घटनेदरम्यान आ.राजेश एकडे यांनी सांत्वनपर भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

loading image
go to top