सिंदखेड राजा : जिजाऊ सुष्टी जवळ ट्रॅव्हलला आग

सदर घटना ही रात्री ११.३० वाजता घडली असल्याची माहिती आहे.
जिजाऊ सुष्टी जवळ ट्रॅव्हलला आग
जिजाऊ सुष्टी जवळ ट्रॅव्हलला आग sakal

सिंदखेड राजा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ सुष्टी जवळ धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली, सदर घटना ही रात्री ११.३० वाजता घडली असल्याची माहिती आहे. सूत्रानी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पुण्यावरून रायपूर कडे ट्रॅव्हल्स प्रवासी घेऊन निघाली होती.

जालना वरून नागपूर कडे प्रवासाठी निघाल्यानंतर सिंदखेड राजा जवळ असलेल्या जिजाऊ सृष्टी च्या समोर काही अंतरावर पोहोचल्यानंतर अचानक पणे ट्रॅव्हल्स मध्ये अचानक आग लागल्याची समजतात ट्रॅव्हल्स चालकाने ट्रॅव्हल्स जिजाऊ सृष्टीच्या समोर रस्त्याच्या एका बाजूला ट्रॅव्हल्स उभी केली.त्यानंतर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा तात्काळ प्रसंगावधान राखून ट्रॅव्हल्स मधून बाहेर पडले.

जिजाऊ सुष्टी जवळ ट्रॅव्हलला आग
उस्मानाबाद : बालविवाह प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

ट्रॅव्हल्स मध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रॅव्हल्स ला लागलेली आग एवढी भीषण होते की, दूरपर्यंत जाळ व धूर पहायला मिळत होता. काही वेळेसाठी दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती.अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे व त्यांचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पुढील तपास पोलीस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com