esakal | बुलढाणा : बैल धुण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

buldhana

बुलढाणा : बैल धुण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि. बुलढाणा) : पोळ्या अगोदरच्‍या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्‍या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कारेगाव शिवारात घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील बोरी अडगाव येथील माजी सरपंच निरंजन सुरवाडे यांचा मोठा मुलगा आशुतोष निरंजन सुरवाडे वय २२ वर्ष हा उद्या पोळा सण असल्याने आज सकाळी १० वाजता बैल धुण्यासाठी गावा शेजारील कारेगाव शिवारातील तलावामध्ये मित्रांसोबत गेला होता. दरम्यान, तलावामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब सोबत असलेल्‍या मित्रांच्‍या लक्षात येताच त्‍यांनी आशुतोषला पाण्याबाहेर काढले व खामगाव येथील सामान्‍य रुग्‍णालयात त्‍याला उपचारार्थ दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासणी त्‍यास मृत घोषीत केले.

हेही वाचा: यवतमाळ : ‘त्या’ पाच कुटुंबांचा आधारवडच कोसळला

आशुतोष याचे बीए पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, त्‍याच्‍या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा बराच मोठा आप्‍त परिवार आहे. खामगाव येथील सामान्‍य रुग्‍णालयात त्‍याचे शवविच्‍छेदन करुन बोरीअडगाव येथे त्‍याचेवर अत्‍यंसंस्‍कार करण्यात आले.

loading image
go to top